व्यासपीठावर मुख्यमंत्री शिंदे फडणवीस पवारांना भेटले; …म्हणून मी मागून गेलो अजितदादांच उत्तर

0
1

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना टिळक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पंतप्रधानांच्या या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार उपस्थित होते. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले.

स्टेजवर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यासमोर गेले, हस्तांदोलन केलं. फडणवीसांनीही पवारांची भेट घेतली मात्र अजित पवारांनी शरद पवारांच्या समोर जाणच टाळलं. स्टेजच्या मागच्या बाजूने जाऊन अजित पवार खूर्चीवर जाऊन बसले. याबाबत अजित पवारांना विचारण्यात आलं असता त्यांनी साहेबांचा आदर करतो म्हणून मागून गेलो, असं उत्तर दिलं.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

‘साहेबांचा आदर करतो म्हणून मागून गेलो. आपण आपल्या वडिलधाऱ्यांचा आदर करताना कसं भीतीनं जरा मागून जातो, तसं. रिसपेक्ट आहे,’ अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे. परिवार तो परिवार, राजकीय भूमिका वेगळी असू शकते, अशी प्रतिक्रियाही अजित पवारांनी दिली. तसंच साहेबांनी सांगितलं तरी आम्ही त्यांचे फोटो लावणारच, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.