‘मारलं की मरायचं असतं’; अतुल कुलकर्णीचं महात्मा गांधींवरील रील शेअर करत भिडेंना प्रत्युत्तर

0

संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलच वातावरण तापलं आहे. मनोरंजन क्षेत्रातील मंडळीदेखील यावर व्यक्त होत आहेत. अभिनेता अतुल कुलकर्णीचं अस्वस्थ करणारं रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अतुल कुलकर्णीने कवितेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. महात्मा गांधी यांची हत्या झाली असली तरी ते आपल्यातून गेलेले नाहीत. आजही त्यांची अनेकांना आठवण येते, असं त्यांनी या रीलच्या माध्यमातून अधोरेखित केलं आहे. अतुल कुलकर्णी यांचं अस्वस्थ करणारं रील सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

अतुल कुलकर्णीने रीलमध्ये काय म्हटलं आहे?
तू मर बुवा एकदाचा असं नसतं करायचं! मारलं की मरायचं!!

गोळ्या किती महाग असतात दरवर्षी घ्याव्या लागतात.

तू थकत कसा नाहीस? मरुन मरुन? बाप्पू…

असं नसतं करायचं, मारलं की मरायचं!

एकदा मारुन मेला नाहीस, अनेकदा टोचून विरला नाहीस

बदनाम करुनही बधत नाहीस, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं

मारलं की निमुट मरायचं असतं

तू ना… एक संधी देऊन तर बघ, नोटांवरुन जाऊन तर बघ

ती सबकी सन्मती घालवून तर बघ, असा खुनाचाच वध करायचा नसतो.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

जीव घेतला की सोडायचा असतो, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं.

मारलं की निमूट मरायचं असतं… पुढच्या वर्षी नक्की मर

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नाहीत. तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत असं धक्कादायक वक्तव्य भिडे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका होत आहे.