‘व्हिनस वर्ल्ड स्कूल’चा वार्षिक आढावा मेळावा पार

0
26

व्हिनस वर्ल्ड स्कूलसचा वार्षिक आढावा मेळावा 2023-24 बुधवार दिनांक 5 जुलै रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे सर्व शिक्षक व पालक वर्ग यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याचे अध्यक्ष स्थान शाळेचे संस्थापक माननीय श्री माधवराव सर आणि माननीय सौ पूनम राऊत मॅडम यांनी भूषवले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे करिअर कौन्सिलर, कुटुंब प्रबोधन व बाल शिशुविकास आयाम प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांतचे वक्ते श्री संजयराव कुलकर्णी उपस्थित राहिले.

शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.मृण्मयी वैद्य मॅडम यांनी सन 2023 24 या वर्षात होणाऱ्या वार्षिक कार्यक्रमाचा आढावा सादर केला. वार्षिक आढावा सोहळ्याचे निमित्त साधून पालक-प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन केले.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

कार्यक्रमाचे पाहूणे श्री. संजयराव कुलकर्णी यांनी आपले मूल घडवावे कसे आपण घडवू तसे’ या विषयावर जमलेल्या सर्व पालकांचे प्रबोधन केले. मुलांच्या समस्या, पालकांची कर्तव्ये, मूल घडवत असताना पालकांकडून होणाऱ्या लहान सहान चुका, भारतीय संस्कृतीचे महात्म्य अगदी सहजतेने पटवून दिले. मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात हा सोहळा संपन्न झाला असुन याची सांगता राष्ट्रगीत घेऊन करण्यात आली.