शकुनी मामामुळं महाभारत घडलं; हा मिठाचा खडा माञ टरबुजासारखा कमळासारखा: डॉ.कोल्हे

जनता आपली जागा दाखवणार याची भावना मनात बळावल्यानंतर मनातला शकुनी मामा जागा झाला आणि वेगळे फासे टाकायला लागला.

0

येवला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आज येवल्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख खासदार अमोल कोल्हे यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. राष्ट्रवादीत महाभारत घडवण्यास शकुनी मामा अर्थात फडणवीस कारणीभूत आहेत, असं नाव न घेता त्यांनी म्हटलं आहे.

कोल्हे म्हणाले, “आज अनेक जण म्हणतात महाराष्ट्रात कुरुक्षेत्रासारखी परिस्थिती आहे. कुरुक्षेत्रात काय परिस्थिती होती. एकीकडं कौरव तर एकीकडं पांडव होते. पण हे महाभारत कोणामुळं घडलं? तर ते शकुनी मामामुळं घडलं. महाभारत घडण्यापूर्वी जेव्हा आक्रमण व्हायचं तेव्हा कौरव-पांडव एकत्र येऊन आक्रमण करत होते. सभेतील उपस्थितांना सवाल विचारताना कोल्हे म्हणाले, “पण त्यांच्यात मिठाचा खडा टाकला तो शकुनी मामानं! हा शकुनी मामा कोण आहे? लोक मिठाचा खडा हा टरबुजासारखा किंवा कमळा सारखा आहे असं म्हणताहेत, मला तर दिसताना कमळाचं फूल दिसलं,” असं कोल्हे म्हणाले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

अशा पद्धतीनं वारंवार पक्ष फोडले जात आहेत, आमदार पळवले जात आहेत. हे का होतंय याचा विचार करायला हवा. केंद्रातील सरकारला सत्तेत येऊन ९ वर्षे झाली, त्यासाठी Modi @9, टिफीन बैठका असे कार्यक्रम सुरु झाले. पण इतक्या वर्षात महागाई कमी झाली का?, दर वर्षाला २ कोटी रोजगार मिळणार होते झाले का? शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव मिळणार होता झाला का? नाही झाली ना? ही सगळी पाप बघितल्यानंतर आता आपल्याला जनता आपली जागा दाखवणार याची भावना मनात बळावल्यानंतर मनातला शकुनी मामा जागा झाला आणि वेगळे फासे टाकायला लागला, अशा शब्दांत कोल्हेंनी जोरदार फटकेबाजी केली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन