राजकीय पक्षातून बाहेर पडलेला प्रत्येक गट विठ्ठलाभोवती बडवे, असा उल्लेख करतो. काल अजित पवार यांच्या बैठकीत छगन भुजबळ म्हणाले शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. पण त्यांना बडव्यांनी घेरले आहे. मात्र या वाक्याला आता जोरदार विरोध होत आहे. राजकीय मंडळींनी विठ्ठलाभोवती बडवे, हा वाक्यप्रयोग टाळावा. विठ्ठल मंदिरात कुणीही बडवे पुजारी नाहीत, असे महंत सुधीरदास यांनी म्हटले आहे. वारकरी सांप्रदायाचे किर्तनकार महंत सुधीरदास म्हणाले, विठ्ठल मंदिरात कुणीही बडवे म्हणून पुजारी नाहीत. परंतू गेली हजार वर्ष ज्यांनी विठ्ठलाची पूजा केली. विठ्ठलाची मूर्ती सांभाळली. अफजलखानाचा आघात पंढरपुरवर झाला असताना. याच बडवे परिवाराने विठ्ठलाच्या मुर्तीचे स्वरंक्षण केले. त्यामुळे असे अवमानकारक वक्तव्य करणे चुकीचे आहे.






काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले की, साहेबांना वाईट वाटलं त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं हे स्वभाविक आहे. पण हे का झालं? लोक म्हणतात त्यांचा (शरद पवारांचा) फोटो का लावला? अरे साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. साहेब त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशिर्वाद द्यायला या अशी विनंती आहे. ते आमचे विठ्ठल आहेत म्हणून त्यांचा फोटो लावला, असे भुजबळ म्हणाले. इथे आलेले लोकं वेडे आहेत का? जे लोक तिथे काम कारतात ते याला जबाबदार आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना हाडतूड केली जायची, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
भुजबळांचा पवारांवर घणाघात
साहेबांना वाईट वाटणे साहजिक आहे. आजही माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे. पण साहेब आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा त्यांना देखील असचं वाईट वाटलं. मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होतो. तेव्हा त्यांच्यासोबत ओबीसीच्या मुद्द्यावर मतभेद झाले तेव्हा ३६ लोक तुमच्यासोबत आले. मला सुद्धा येणे भाग पडलं. तुम्ही तिथं थांबा म्हणून सांगितलं नाहीत. तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब यांनाही असंच वाईट वाटलं.










