सत्ता समीकरणाचा भाजपलाही फटका; ५ माजी नगरसेवकांचा रामराम केली ‘या’ पक्षाशी जवळीक

0

सोलापूर : भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आषाढी वारीच्या दौऱ्यामध्ये सोलापूर शहरातील भाजपमधील तेलुगु भाषिक नाराज माजी नगरसेवकांची भेट घेतली होती. दरम्यान, राज्यातील अस्थिर राजकारणामुळे भाजपमधील राजकीय अस्तित्व धोक्यात आलेले नागेश वल्याळ, सुरेश पाटील, जुगनूबाई अंबेवाले, संतोष भोसले, राजश्री चव्हाण या पाच माजी नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता शनिवारी (ता. ८) हैदराबाद येथे हे सर्व बीआरएस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. सोलापुरातील तेलुगु भाषिक राजकीय नेत्यांना मायभूमीची आठवण करून देण्यासाठी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आषाढी वारी केली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

ते सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस तळ ठोकून होते. या दौऱ्यात भाजपमधील नाराज गटाला केसीआर यांनी आकर्षित केले. नागेश वल्याळ यांच्या निवासस्थानी तासभर बंद खोलीत चर्चा झाली. भाजपच्या नगरसेवकांनी निर्णय कळविण्यास वेळ मागितला होता.

अलीकडेच धर्मण्णा सादूल यांनीदेखील भाजपचे दहा माजी नगरसेवक बीआरएसमध्ये लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. तर पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी ३०० कार्यकर्त्यांसह हैदराबाद येथे शनिवारी (ता. ८) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात राजकीय भूकंप झाला. राज्यातील राजकीय अस्थिरतेचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होणार आहे. त्यामुळे भाजपमधील अनेक नगरसेवकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येणार आहे. भविष्यातील धोका लक्षात घेत,

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

भाजपचे पाच माजी नगरसेवक नागेश वल्याळ, सुरेश पाटील, जुगनूबाई अंबेवाले, संतोष भोसले, राजश्री चव्हाण यांच्यासह भाजपचे व्यापारी सेल अध्यक्ष जयंत होले-पाटील यांनी शहराध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. हे सर्व येत्या शनिवारी हैदराबाद येथे पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते. शहरातील दोन्ही देशमुखांच्या घराणेशाहीला कंटाळून आम्ही राजीनामा दिला आहे. गेल्या दहा वर्षांपासून आमच्यावर अन्याय होतो आहे, तरीही आम्ही शांत होतो. याबाबत वेळोवेळी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे.

त्यामुळे शहराध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. शहराध्यक्षांनी पक्षात राहण्याचा आग्रह केला. राजीनामा देताना विचारपूर्वकच निर्णय घेतला असल्याचेही नागेश वल्याळ यांनी सांगितले. मात्र बीआरएस पक्षप्रवेशाबाबत त्यांनी मौन बाळगले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती