कोथरूडमधील थुंबरे पार्क सोसायटीच्या बेसमेंटमध्ये गटाराचे पाणी शिरले; रहिवाशांमध्ये संताप

0

कोथरूडमधील एकलव्य कॉलेज रोडवरील थुंबरे पार्क सोसायटीच्या बेसमेंटमध्ये सोमवारी सकाळी गटाराचे सांडपाणी शिरल्याने मोठी समस्या निर्माण झाली. पाण्याची पातळी तब्बल एक फूटांवर गेली होती. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पुणे महापालिकेचे (PMC) अधिकारी विजय नाईकाळ यांनी माहिती दिली की, “चौकाजवळील ड्रेनेज लाईन पुरेशी मोठी नसल्यामुळे हा प्रकार घडला. पावसामुळे सांडपाणी ओसंडून वाहत सोसायटीच्या आवारात शिरले. ही सोसायटी शौर्य सोसायटीच्या जवळ आहे.”

नाईकाळ यांनी पुढे सांगितले की, “आमच्या पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून, संध्याकाळपर्यंत बेसमेंटमधील पाणी उपसण्याचे काम सुरू होते.”

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते निलेश कोंढाळकर यांनी सांगितले की, “दरवर्षी पावसाळ्यात हीच समस्या पुन्हा पुन्हा उद्भवते. बेसमेंटमध्ये सांडपाणी शिरणे हे नेहमीचे झाले आहे. आम्ही PMC कडे वारंवार तक्रार केली आहे. आज कोथरूड विभागीय कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी आले आणि तत्काळ मदतकार्य सुरू केले.”

कोंढाळकर पुढे म्हणाले की, “PMC च्या अधिकाऱ्यांनी कबूल केले की, या परिसरातील ड्रेनेज लाईनची क्षमता अपुरी आहे. त्यांनी लवकरच ती वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष बाब म्हणजे, या भागात फक्त थुंबरे पार्क सोसायटीलाच ही समस्या भेडसावते, अन्य सोसायट्यांमध्ये असा प्रश्न निर्माण होत नाही.”

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!

या प्रकारामुळे सोसायटीमधील रहिवाशांमध्ये संतापाची भावना असून, कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे.