देशाला मोदींशिवाय पर्याय नाही; अजित पवारांची स्पष्ट भूमिका

0

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत सत्तेत सहभागी झाले आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान आज अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली, या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळाची पहिली बैठक ९ मंत्र्यांची होती आम्हाला अडीच वर्षाचा अनुभव आहे. मध्ये एक वर्षाचा गॅप पडला. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय आम्ही मार्गी लावले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

एकनाथ शिंदे यांनी आणि मी सोबत काम केले आहे. भाजपमधील अनेक नेत्यांसोबत मी काम केले आहे. विकासाच्या मुद्द्यांवर मी सरकारसोबत आलो आहे. देशपातळीवर नरेंद्र मोदींशिवाय आज देशाला पर्याय नाही. देश त्यांच्या नेतृत्वाखाली आगेकूच करत आहे, असे अजित पवार म्हणाले.

खातेवाटपावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे. आम्ही एकत्रपणे काम करायचे ठरवले आहे, असे पवार म्हणाले.