लेशपाल जवळगे व हर्षद पाटिल यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य पुरस्काराने गौरव

0
2

सदाशिव पेठ येथे तरुणीवर हल्ला करणाऱ्या नराधमाला धाडसाने पकडून तरुणीचा जीव वाचवणारे राष्ट्रीय कबड्डी पंच लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांना अभिजितदादा कदम मित्र मंडळ व प्रतिष्ठान संचालित डॉ पतंगराव कदम महिला कबड्डी संघ, ४० प्लस पुणे क्रिकेट संस्था व एस एम व्ही १९९० बॅच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य पुरस्कार राष्ट्रीय विद्यापीठ खेळाडू कु. सानिका खाडे व महिला खेळाडूच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

४५ प्लस क्रिकेट संस्थेचे अध्यक्ष राहुल साठे यांनी उपस्थित खेळाडूंचे स्वागत केले. शंकरराव मोरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री दत्ता गायकवाड यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले कि श्री छञपती शिवाजी महाराच्या विचाराचा वारसा लेशपाल व हर्षदने अंमलात आणला आहे. वृत्तपञ विक्रेते संघाचे अध्यक्ष श्री विजय पारगे यांनी सांगितले की लेशपाल व हर्षद यांचा आदर्श समाजातील प्रत्येक व्यक्तिने घेतला तर विकृत मानसिकतेला आळा बसेल. श्री सागर खळदकर हे म्हणाले लेशपाल व हर्षद हे जरी एमपीएससी देत असले तरी या घटने मूळे ते जनतेच्या मनातील पोलिस अधिकारी झाले आहेत. जनभावना लक्षात घेऊन मा. मुख्यमंञ्यानी या दोघांची थेट पोलिस दलात नियुक्ती करावी.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

पुरस्काराला उत्तर देताना लेशपाल म्हणाला या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मुलीनी मैञी सावधपणे केली पाहिजे व हा पुरस्कार मला पुढील भविष्यासाठी प्रेरणा देत राहील.
कार्यक्रमासाठी श्री सुनील ढमाले, श्री अनिल ढमाले, श्री माने सर, श्री सुरज कळंञे, श्री प्रवीण पवार, श्री अतुल मराठे,अजय हुलावळे व अंकुश गजमल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नामदेव ओहोळ यांनी केले.