वांद्रे पालिका अधिकारी मारहाण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने अनिल परब यांना दिलासा दिला आहे. यामुळे परब यांची अटक तात्पुरती टळली आहे.
अनिल परब यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा, अटकपूर्व जामिनानवर न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णयअनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा
राज्याचे माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि इतर सहा जणांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी आज सुनावणी झाली. अनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून, 4 जुलैपर्यंत अटक किंवा कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे कोर्टाने पोलिसांना निर्देश दिले आहेत. वांद्रे पालिका अधिकारी मारहाण प्रकरणात अनिल परब आणि इतर 6 जणांना दिलासा मिळाला आहे. वरिष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. सुदीप पासबोला यांनी परब यांच्या वतीने युक्तिवाद केला.तर अॅड. जयसिंह देसाई यांनी सरकारची बाजू कोर्टात मांडली. घटनेत किंवा मारहाणीमध्ये परब यांचा सहभाग नाही. ते फक्त सदर ठिकाणी उपस्थित होते, असं अॅड. पासबोला यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला. मात्र या प्रकरणी पुढील सुनावणी 4 जुलै रोजी होणार आहे.
4 जुलैपर्यंत कोणतीही कारवाई नाही
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना तूर्तास अटकेपासून दिलासा मिळाला आहे. परब आणि 6 जणांवर 4 जुलैपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह अन्य सहा जणांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. मंगळवारी मुंबई पोलिसंनी वाकोला पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर परब आणि इतर यांच्या वतीने तातडीनं हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला.