एलॉन मस्क याच्या तोंडचे पाणी पळाले, 50 लाखांचा दंड, काय आहे प्रकरण

0
1

जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क याने ट्विटरची मालकी घेतल्यापासून ट्विटर आणि वादाचे समीकरण कायम आहे. ट्विटरच्या अनेक निर्णयावर युझर्स तर नाराज झालेच. पण कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. ट्विटरचा पसारा जगभर आहे. भारतात केंद्र सरकारने ट्विटरचे कान पिळले आहे. दरम्यान आता ट्विटरची हायकोर्टाने बोलती बंद केली. ट्विटरची याचिका पण फेटाळली. एवढेच कमी होते की काय, ट्विटरला 50 लाखांचा दंड पण ठोठावला, त्यामुळे एलॉन मस्कच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काय आहे हे प्रकरण?

काय होती याचिका
भारतीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाविरोधात ट्विटरने याचिका दाखल केली होती. मंत्रालयाने ट्विटरला काही आदेश दिले होते. त्यानुसार, केंद्र सरकार काही ट्विट ब्लॉक करु शकते आणि अशा अकाऊंटला लगाम घालू शकते. या आदेशाविरोधात ट्विटरने हायकोर्टात दाद मागितली होती.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

ठोठावला दंड
कर्नाटक उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी झाली. हायकोर्टाने याचिका दाखल करण्यासाठी ठोस आधार नसल्याचे म्हटले आहे. हायकोर्टाने ट्विटरला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला. न्या. कृष्ण. एस. दीक्षित यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. 45 दिवसात दंडाची रक्कम कर्नाटक राज्याच्या विधी सेवा प्राधिकरणात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.