पुढील ४८ तास ‘माळीण’ ची भीती; राज्यातील ‘या २१ जिल्ह्यांना धोका ‘ यलो व ऑरेंज अलर्ट’ जारी

0

राज्यात सर्वदूर मॉन्सून पोहोचल्याने अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. महराष्ट्रातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे याठीकाणी दरळ कोसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सतर्क’ने याबाबत अपडेट दिले आहे. त्यामुळे घाट रस्त्यांवरून प्रवास करताना काळजी घेणे. तसेच जीर्ण वाडे, घरे, टेकड्यांच्या उतारावर/ पायथ्याशी असणाऱ्या कुटुंबांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पावसाच्या हजेरी, ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात घसरण होत आहे. सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी तापमान २७ ते ३६ अंशाच्या दरम्यान होते. राज्यात सर्वदूर पावसाने हलक्या ते मध्यम हजेरी लावली असून, कोकणात पावसाचा जोर कायम आहे.

वायव्य भारतात मॉन्सूनची प्रगती

यंदा केरळसह देशात यंदा काहीसा उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनने वेगाने घोडदौड देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. सोमवारी (ता. २६) वायव्य भारतात मॉन्सूनने प्रगती केली असून, जम्मू काश्मिर, लडाख व्यापून, उत्तर अरबी समुद्र, गुजरात, राजस्थान, हरियाना, पंजाबच्या आणखी काही भागात मान्सून दाखल झाला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) – पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) – सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) – बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.