सुरेश प्रभूंमुळे कुडाळ स्टेशनचा विकास थांबला? पाहा प्रभूंनी कोकण रेल्वेचा काय विकास केला…

0
1
सुरेश प्रभू with Ms Gabriella Romes, Assistant Director General of UNESCO

सुरेश प्रभू यांच्यामुळे कुडाळ स्टेशनचा विकास थांबला, असे मत कुडाळमधील काही विरोधी राजकारणी मंडळींनी मांडले. परंतु यासंबंधी या राजकीय व्यक्तींनी कोणताही मागील इतिहास किंवा वस्तुस्थिती तपासून पाहिली नाही. ज्यावेळी प्रवासी वाहतूक जंक्शन म्हणून केली जाते, त्यावेळी मालवाहतूक करणारे जंक्शन वेगळे केले जाते. मालवाहतुकीसाठी झाराप स्टेशन देण्यात आले व त्या ठिकाणी मालवाहतुकीची चढ-उतार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्टेशन आधुनिक होण्यासाठी प्रयत्न केले. रेल्वे विद्युतीकरण करण्यासाठी विशेष आर्थिक बजेट करून ठेवले म्हणून कोकण रेल्वेचे दिलेल्या मुदतीच्या आधीच विद्युतीकरण होऊ शकले.

कोकण रेल्वेचा फक्त एकमेव एकच मार्ग (ट्रॅक) होता, दुपदरीकरण करण्यासाठी पाच हजार करोड रुपयाचे बजेट होते. कोकण रेल्वे अजूनही रेल्वे बॉडचे पैसे परत देणे आहेच. कोकण रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात माल वाहतुक नाही.असे असताना पाच हजार कोटींच्या प्रकल्पाला हात घालणे कोकण रेल्वेसारख्या कार्पोरेशनला परवडण्यासारखे नव्हते म्हणून प्रभू यांनी दुपदरीकरणासाठी ज्या ठिकाणी बोगदे व मोठे पूल आहेत त्याच्या दोन्ही बाजूला नवीन स्टेशन बांधण्याचा प्रस्ताव करून त्याला निधी उपलब्ध करून दिला. LIC मार्फत कार्पोरेट फंड कोकण रेल्वेला उपलब्ध करून दिला. यामुळे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम 95% पूर्ण झाले आहे.
त्याचबरोबर सावंतवाडीतील मळगाव स्टेशनला प्रभुंमुळेच टर्मिनल दर्जा मिळू शकला. नाहीतर हे स्टेशन म्हणूनच राहिले असते.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

कुडाळ स्टेशन व प्रभूंचे योगदान….
कुडाळ रेल्वे स्टेशनचा विचार करता याठिकाणी पूर्ण स्टेशन सोलर वर चालण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्याचबरोबर तिकीट काउंटर हा स्टेशन पासून दूर होता, तो मुख्य स्टेशनवर आणून त्याचा एक काउंटर वाढवण्यात आला.
कुडाळ स्टेशनचा मालवणला जाण्यासाठी उपयुक्त असणारे स्टेशन म्हणून व मध्यवर्ती स्टेशन म्हणून याच ठिकाणी कॅफेटोरीया प्रस्तावित करून ठेवले आहे.
त्याचबरोबर रेल्वे स्टेशनच्या समोरील भाग पूर्णपणे सुशोभीकरण करण्यासाठी प्रस्तावित करून ठेवले आहे.
रेल्वे स्टेशनचा विचार करता या स्टेशनवर राजधानी एक्सप्रेस रेल्वेला थांबा देण्यात आला.
भारतामधील पहिल्या तेजस रेल्वेचा मुख्य थांबा कुडाळ स्टेशनला देण्यात आला. अशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी बऱ्याच गोष्टी प्रभू यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून केल्या. ह्या गोष्टी विरोधकांना कधी दिसल्या नाहीत किंवा जाणूनही घेतल्या नाहीत.
स्टेशनवर जलद रेल्वे थांबते, त्याच ठिकाणी दुसरी नवीन जलद रेल्वेला थांबा दिला जात नाही. त्यामुळे वंदे भारत रेल्वेला कणकवली येथे थांबा मिळाला आहे. गणपती, दिवाळी, होळी व नवीन वर्ष यावेळी सर्वात जास्त विशेष रेल्वे सोडण्याचा श्रेय प्रभू यांनाच मिळते. प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतरच एवढ्या मोठ्या प्रमाणात जादा रेल्वे सुटण्यास सुरुवात झाली आहे.
प्रभू रेल्वेमंत्री झाल्यावर प्रथमच आपले मत जनतेसमोर मांडताना म्हणाले होते, “रेल्वेमध्ये आपले स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व रेल्वेमध्ये मेड इन इंडिया, असा ठसा उमटवण्यासाठी माझे कायम योगदान राहील.” याचमुळे वंदे भारत सारखी रेल्वेचा विचार प्रभू साहेबांच्या रेल्वेमंत्री असताना रेल्वे मंत्रालयात पहिल्यांदाच झाला होता. त्याचीच प्रचिती म्हणून वंदे भारतला आवश्यक असणारे कोच निर्माण करण्याचा भारतीय रेल्वेने प्रभूचा मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला होता व तो तेजस या रेल्वेच्या रूपाने यशस्वी झाला. त्यामुळे वंदे भारत ट्रेनची पायाभरणी ही प्रभु साहेबांनी केली होती.
या सर्वांगीण गोष्टींचा विचार केला तर प्रभुंनी कोणत्याही प्रकल्पाला विरोध केला नाही, सकारात्मक विचार करून कोकणचा कसा फायदा होईल याकडे पूर्ण लक्ष दिले. आपल्या मंत्रिपदाचा परिपूर्णपणे विकासशील दृष्टिकोन ठेवून भरभरून योगदान दिले आहे .
प्रभू कायम सांगतात,”आपल्या आईच्या दुधाचे ऋण आपण कधी फेडू शकत नाही. तसेच मी कोकणच्या जनतेचे कधी ऋण फेडू शकत नाही. या भावनेतूनच मी कोकण कडे विकासाच्या दृष्टीने लक्ष देत असतो.”
याचमुळे अशा टिकांकडे कोणताही लक्ष न देता प्रभु कायमच विकासासाठी, कोकणच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करत राहिले आहेत. काहींना वाटते प्रभुंची तळी उचलणारा विजय केनवडेकर आपले असेच मत मांडणार. असे असले तरी कोकण रेल्वेच्या सल्लागार समिती वर सहा वर्ष मी होतो. त्यावेळी प्रभुंनी दोन वर्षांमध्ये कोकण रेल्वेसाठी, कोकण रेल्वेच्या उद्धारासाठी काय प्रयत्न केले, हे मी स्वतः पाहिले आहे. त्यामुळे वस्तुस्थिती पाहूनच मी हे मुद्दे मांडले आहेत. यासंबंधी सर्वसामान्य जनता ही पूर्णपणे प्रभुंचे कार्य ओळखून आहे. टीका-टिपणीला उत्तर देणे प्रभुंचे कार्यक्षेत्र नाही. त्यामुळे प्रभु कधी टीकेला उत्तरही देणार नाही; परंतु वस्तुस्थिती समजण्यासाठीच हे मत मांडणे आवश्यक होते म्हणून हा छोटा प्रयत्न.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

– विजय केनवडेकर
माजी सदस्य: कोकण रेल्वे सल्लागार समिती. भारत सरकार