कल्याण लोकसभा आजी माजी आमदारांची बंद दाराआड चर्चा? या भेटीने चर्चांना उधाण!

0

कल्याण लोकसभा मतदार संघात राजकीय उलथापालथ सुरू आहे. त्यातच या मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर व भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड या आजी माजी आमदारांनी बंद दरवाजा आड एकमेकांची भेट घेतली आहे.योग्य वेळी आम्ही योग्य चर्चा करू असे सूतोवाच दरम्यान आमदारांनी दिल्याने उपस्थित साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सक्रिय झाले असताना ठाकरे गट आणि भाजप पक्ष यांच्या आमदारांच्या या भेटीने भविष्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील सत्तेची गणिते बदललेली पहायला मिळतील का ? या चर्चांना उधाण आले आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

राज्यात मित्रपक्षात धुसफूस सुरू असून ठाणे जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघाची जोरदार चर्चा आहे. शिंदे गटाच्या या हक्काच्या जागेवर भाजप देखील दावा करत शिंदे यांना आव्हान देऊ केले आहे.

भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बॅनरवर भावी खासदार असा भोईर यांचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा देऊ केल्या. याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी आमदार आनंद परांजपे हे देखील पुन्हा सक्रिय झाले असून त्यांच्या ही नावाची चर्चा इच्छुक उमेदवारांत केली जात आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू असून यामध्ये मनसे आणि ठाकरे गटाची साथ मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच गुरुवारी कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण ग्रामीण चे आमदार सुभाष भोईर यांनी गायकवाड यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा देत भेट घेतली.

यावेळी बंद दाराआड त्यांच्यात चर्चा देखील झाल्याने त्यांच्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार गायकवाड म्हणाले, आमचे घरचे संबंध आहेत. ते मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते. असे असेल तरी बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी? याची चर्चा आता रंगू लागली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

माजी आमदार भोईर हे लोकसभेची तयारी करत आहेत का ? भविष्यात भोईर हे भाजपची वाट धरणार का ? याची पुन्हा एकदा या भेटीने चर्चा होत आहे. शिंदे भाजप गटातील वाद क्षमला नाही तर भाजप छुप्या पध्दतीने ठाकरे गटाला देखील मदत करू शकतात अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. यामुळे भविष्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील सत्तेची गणिते बदललेली दिसली तर आश्चर्य वाटायला नको.