IIFA 2023 मध्ये अनिल कपूरला मिळाला ‘हा’ पुरस्कार

0
anil kapoor
अनिल कपूर

अभिनेता अनिल कपूरने आपला पुरस्कारांचा सिलसिला कायम सुरू ठेवला असून IIFA 2023 मध्ये बेस्ट सपोर्टिंग रोल (मेल) पुरस्कार पटकावला आहे! अनिल कपूरने  ‘जुग जुग जीयो’साठी ‘परफॉर्मन्स इन अ सपोर्टिंग रोल – पुरुष’ हा खास पुरस्कार पटकावला !

अभिनेता अनिल कपूर याने त्यांच्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. विविध भूमिका साकारून तो प्रेक्षकांच्या मनात राहिला आहे. नुकताच त्याला IIFA 2023 पुरस्कार सोहळ्यात ” परफॉर्मन्स इन अ सपोर्टिंग रोल – पुरुष ” या साठी सन्मानित करण्यात आलं.  अनिल कपूर यांची जुग जुग जियो चित्रपटातील दमदार  अभिनयासाठी हा खास पुरस्कार देण्यात आला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

या वर्षात अनिल कपूर यांनी फिल्मफेअरसह असंख्य पुरस्कार जिंकले आहेत हे वर्ष अनिल कपूर यांच्या साठी नक्कीच ” पुरस्कारमय ” होतंय.
अनिल कपूरकडे आगामी काळात बहुप्रतीक्षित चित्रपटाची यादी आहे.  अॅनिमल, फायटर आणि अभिनव बिंद्रा बायोपिक यासारखे अनेक कमालीच्या प्रोजेक्ट्स मधून ते दिसणार आहेत.