IPL 2023 : महेंद्र सिंग धोनीच्या खास भिडूला लागली लॉटरी, थेट कर्णधारपद झाली निवड!

0

हाराष्ट्र प्रीमिअर लीगमधील सहभागी होणाऱ्या 6 संघांपैकी एक संघाने त्याला आपल्या संघाचं कर्णधारपद केलं आहे. 15 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून सर्व सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहेत.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या पाठिंब्याने झालेल्या T20 फ्रँचायझी लीगमध्ये पुणे फ्रँचायझीला विक्रमी 14.80 कोटी रुपये मिळाले. पुण्यानेच ऋतुराज गायकवाडवर आयकॉन खेळाडू म्हणून बोली लावली होती. त्याला या फ्रँचायझीचा कर्णधारपदही देण्यात आलं आहे.

आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याचबरोबर यंदाच्या मोसमातही त्याने महत्त्वाच्या खेळी केल्या. ऋतुराज गायकवाडने IPL 2023 च्या 16 सामन्यांमध्ये 590 धावा केल्या आहेत ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय गायकवाडने टीम इंडियासाठी 1 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघातील स्टँडबाय खेळाडूंपैकी एक म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली होती. मात्र 4 जून रोजी लग्न झाल्यामुळे त्याने आपलं नाव मागं घेतलं आहे. महाराष्ट्राची महिला क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत लग्नबंधनात अडकला आहे.