मुंबई : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी भाजपत राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना साद घातली आहे. त्यांनी भाजपत पुन्हा परतावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या सारख्या नेत्याची पक्षाला गरज आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
तावडे म्हणाले, “एकनाथ खडसेंनी भाजपत परत आलं पाहिजे, त्यांच्यासारख्या नेत्याची पक्षाला गरज आहेच. त्यांच्यासारख्या वरिष्ठ लोकांनी येणं पण नुसतं येणं म्हणजे नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात तसं अपेक्षित नसेलच. पण जी जी माणसं पक्षात आली पाहिजेत असं आम्हाला वाटतं त्यानुसार नाथाभाऊंनी नक्की आलं पाहिजे”. माध्यमांशी बोलताना त्यांनी खडसेंना ऑफर दिली आहे.
“सगळ्या पक्षातील दुःखी माझ्याशी बोलतात. केवळ भाजपचेच कशाला? कारण शेवटी आम्ही राजकीय क्षेत्रात वावरत असतो. त्यामुळं आमच्या पक्षात असं झालं वैगरे सर्वजण बोलत असतात. यामध्ये शेअरींग असतं विनोद तावडेंनी त्यावर बोलावं असं काही नाही. आम्ही जे काही आदान प्रदान करतो त्यातून त्यांना काही सूचतं आम्हालाही काही सूचतं. पण मला असं वाटतं की मुळात असा ज्याच्यावर अन्याय होतो त्याला पेशन्स ठेवावे लागतात, असंही तावडे पुढे म्हणाले.