खडकवासला ‘शासन आपल्या दारी’त १३६० कामे मार्गी; प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका : तापकीर

0

खडकवासला ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे उदघाटन आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले. एक हजार ३६० नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा लाभ घेतला. तालुका पातळीवरील विविध १५ विभाग सहभाग झाले होते. महावितरणच्या संबधी अनेकजण विविध कामे घेऊन आले होते. पण त्यांचे अधिकारी कोण आले नव्हते. तसेच पावसाळा आला असताना कृषी विभागाने अद्याप बियाणे, कृषी साहित्य नसल्याने आमदार तापकीर यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रांताधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे, गटविकास अधिकारी भूषण जोशी, तालुका कृषी अधिकारी एम.डी.साळे, आरोग्य अधिकारी डॉ.सचिन सूर्यवंशी, सचिन वि.दांगट, सचिन मोरे, सरपंच सचिन पायगुडे, नितीन वाघ, ममता दांगट, किरण बारटक्के, सुभाष नाणेकर, उमेश सरपाटील, सचिन द.दांगट, भगवान मोरे, बाजीराव पारगे, नवनाथ तागुंदे, निखिल धावडे, अतुल धावडे यावेळी उपस्थित होते. अभियानचे नियोजन मंडल अधिकारी सूर्यकांत पाटील, प्रमोद भांड, व्यंकटेश चिरमुना, तलाठी सपना लोहकरे, प्रगती मोरे यांनी केले होते.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

आमदार तापकीर म्हणाले, ‘कार्यालयात गेल्यावर एका दिवसात कामे पूर्ण होत नाही. या अभियानातून प्रत्येक विभागाचे प्रमुख येथे असतात. त्यामुळे, नागरिकांची एका दिवसात कामे पूर्ण होतात. या अभियानातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे.’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरु झाले आहे. प्रत्येक मंडल पातळीवर होणार आहे. हे अभियान राबविण्यात आमदार भीमराव तापकीर व त्यांच्या कार्यकर्त्यांचे योगदान मिळाले. असे प्रांताधिकारी संजय आसवले यांनी सांगितले. सूत्रसंचालन रमेश धावडे यांनी केले.

विभाग आणि लाभार्थी संख्या

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

रेशन कार्ड-२७०,

आरोग्य विभाग (पंचायत समिती)- २५८,

राज्य परिवहन महामंडळ एसटी- २५०,

विविध शासकीय दाखले- १९५,

आधार कार्ड- ११५,

एकात्मिक महिला बालविकास प्रकल्प- ७१,

महापालिकेच्या (समाजकल्याण)- ४८

कृषी विभाग (महाराष्ट्र शासन)- ३२,

आरोग्य विभाग(महापालिका)- २०,

संजय गांधी निराधार योजना- ३०,

ग्राम विकास व पंचायत समिती- २१,

भुमिअभिलेख- १२,

मतदार नोंदणी- ५,

एकूण- १३६०.