लोकसभा जागा पवारांची भूमिका स्पष्ट ; म्हणाले, “….त्या ठिकाणी मनाची तयारी ठेवावीच लागेल”

0
1

लोकसभा निवडणूक आता एक वर्षावर येऊन ठेपली आहे. बहुतांश पक्षांनी यासाठी तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी यासाठीच्या बैठका सुरू केल्या आहेत. महाविकास आघाडीतले शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठका होत असताना दुसऱ्या बाजूला हे तिन्ही पक्ष स्वतंत्र बैठकादेखील घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या याबाबतच्या बैठका सुरु आहेत. राज्यात अनेक वर्ष आमदार राहिलेल्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादीची चाचपणी सुरु आहे.

मंगळवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने लढवल्या जागांचा घेतला आढावा घेतला. “गेल्या लोकसभा निवडणुकीत (२०१९) राष्ट्रवादीने जागा लढवल्या तरी तिथे ठाकरे गटातील खासदार आहे, त्या जागा सोडण्याची वेळ आली तर तयारी ठेवावी लागेल,” असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारच्या बैठकीत स्पष्ट केले.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

कुणाला तिकीट मिळणार

काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीने न लढवल्या जागेची मागणी केली आहे. धुळे मतदारसंघ मिळावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. ज्या जागा राष्ट्रवादी लढवणार त्या मतदारसंघात अपेक्षित उमेदवाराबाबत पक्ष सर्व्हे करणार आहे. ज्या उमेदवाराला जास्त पसंती मिळेल त्याला तिकीट मिळेल अशी चर्चा झाल्याचे समजते. राज्यातील निवडणुका महाविकस आघाडीने एकत्र लढवाव्या अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

काँग्रेसची दोन जूनला बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची गेल्या आठवड्यात बैठक झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “निवडणुकांच्या दृष्टीकोनातून काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची पहिली बैठक पार पडली. येत्या दोन तीन तारखेला (२, ३ जून) आम्ही राज्यातल्या सगळ्या जागांवर चर्चा करण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, नेते, आजी-माजी खासदार-आमदार, प्रमुख नेते या सगळ्यांना मुंबईत बोलावून प्रत्येक जागेवर चर्चा करू. त्या माध्यमातून तीन पक्षांची जी समिती तयारी झाली आहे. त्या समितीला सामोरे जाऊ,”

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली