28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार्या संसद भवनाबाबत नवीन माहिती समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामात देशभरातून साहित्य वापरण्यात आलं आहे. एक प्रकारे, संपूर्ण देश लोकशाहीचे मंदिर बांधण्यासाठी एकत्र आलेला दिसतो.
अशा प्रकारे एक भारत श्रेष्ठ भारतच प्रतिनिधित्व करणारी ही नवी इमारत असेल.
जाणून घ्या कोणत्या भागातून कोणतं साहित्य या इमारतीसाठी वापरण्यात आलं आहे –
सागवान लाकूड महाराष्ट्रातील नागपूर इथून आणलं आहे.
सँडस्टोन (लाल आणि पांढरा) सर्मथुरा, राजस्थान इथून खरेदी करण्यात आला.
इमारतीमध्ये वापरलेलं कार्पेट मिर्झापूर, उत्तर प्रदेश इथून आणलं आहेत.
बांबूचे लाकूड फ्लोअरिंग आगरतळा, त्रिपुरा इथून आणलं आहे
दगडी जळीची कामे राजनगर, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील नोएडा इथून करण्यात आली आहेत.
अशोक चिन्ह महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि राजस्थानमधील जयपूर इथून आणलं
अशोक चक्र मध्य प्रदेशातील इंदूर इथून आणलं.
काही फर्निचर मुंबईतून आणण्यात आलं आहे.
संरचनेत वापरलेला लाखा लाल ग्रॅनाइट राजस्थानच्या जैसलमेरमधील लाखा इथून आणला.
केशरिया ग्रीन स्टोन उदयपूरमधून आणि अंबाजी पांढरा संगमरवरी राजस्थानमधील अंबाजी इथून आणला आहे.
अबू रोड आणि उदयपूर येथून दगडी कोरीव काम आणलं आहे आणि कोटपुतली, राजस्थान इथून दगड आणलं आहे.
एम-वाळू हरियाणातील चकरी दादरी येथून खरेदी करण्यात आली
फ्लाय अॅश ब्रिक्स एनसीआर हरियाणा आणि उत्तर प्रदेश इथून आणण्यात आली.
ब्रासवर्क आणि प्री-कास्ट खंदक गुजरातमधील अहमदाबाद इथून आणले.
लोकसभा आणि राज्यसभेच्या वरची फॉल्स सीलिंग स्टीलची रचना दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातून आली.