कोकण विभागाचा सर्वाधिक 96.1 टक्के तर मुंबईचा निकाल सगळ्यात कमी 88.13 निकाल

0

मुंबई: बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून राज्यभरातून 91.25 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजे 96.1 टक्के तर मुंबईचा निकाल सगळ्यात कमी म्हणजे 88.13 टक्के इतका लागला आहे. लातूर बोर्डाचा निकाल 90.37 टक्के आणि अमरावती विभागाचा निकाल 92.75 टक्के इतका लागला आहे. या दोन्ही विभागात मुलींनी बाजी मारल्याचं दिसून आलं आहे.

लातूर बोर्डाचा 90.37 टक्के निकाल, निकालात मुलींची बाजी

लातूर बोर्डाचा निकाल 90.37 टक्के इतका लागला असून मुलीचे पास होण्याचे प्रमाण हे 94 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं दिसून आलं आहे. लातूर बोर्डांतर्गत लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात लातूर जिल्ह्याचा निकाल 92.66 टक्के इतका लागला आहे. उस्मानाबाद जिल्हा 89.75 टक्के आणि नांदेड जिल्ह्याचा निकाल 88.56 टक्के लागला आहे. या निकालात मुलींनी बाजी मारल्याचे दिसत आहे. मुलीची पास होण्याची टक्केवारी 94.16 इतकी आहे तर मुलांची 87.32 टक्के आहे. लातूर विभागाच्या निकालावर सर्व राज्याचे लक्ष लागलेले असते. कारण राज्यभरातून येथे विद्यार्थी येत असतात. या वर्षी एकूण 88,051 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्या पैकी 79,572 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाचा निकाल 90.37 टक्के लागला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अमरावती विभागाचा निकाल 92.75 टक्के

अमरावती विभागाचा 92.75 टक्के निकाल लागला असून राज्यात हा विभाग चौथ्या क्रमांकावर आहे. अमरावती विभागात एकूण 1 लाख 38 हजार 564 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 28 हजार 521 विद्यार्थी पास झाले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी आदी शाखेचा गोषवारा बघता निकालात मुलीच आघाडीवर आहे. अमरावती विभागात सर्वाधिक निकालात वाशिम जिल्ह्याने बाजी मारली. वाशिम जिल्ह्याचा 95.45 टक्के निकाल लागला असून बुलढाणा जिल्हा 93.69 टक्के, अकोला जिल्हा 93.11 टक्के, यवतमाळ जिल्हा 91.98 टक्के आणि सर्वात कमी अमरावती जिल्ह्याचा नंबर आहे. अमरावती जिल्ह्याचा निकाल 90.78 टक्के निकाल लागला आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

विभागात किती विद्यार्थ्यांना किती टक्के मिळाले

अमरावती विभागात 14 हजार 15 विद्यार्थी यांना 75 टक्केच्या वरती गुण मिळाले तर 45 हजार 456 विद्यार्थ्यांना 60 ते 75 टक्के आसपास गुण मिळाले. तसेच 53 हजार 985 विद्यार्थ्यांना 35 ते 60 टक्केच्या आसपास गुण मिळाले आणि 15 हजार 65 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहे.

महाराष्ट्रात बारावीचा निकाल 91.25 टक्के; पाहा विभागनिहाय टक्केवारी

महाराष्ट्रात बारावीचा निकाल 91.25 टक्के.
मुलींचा निकाल 93.73 टक्के
मुलांचा निकाल 89.14 टक्के निकाल
कोकण विभागाचा 96.1 तर मुंबईचा निकाल सगळ्यात कमी म्हणजे 88.13 टक्के.
गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल घटला.
1416371 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 1292468 विद्यार्थ्यी उत्तीर्ण, म्हणजेच, राज्याचा निकाल 91.25 टक्के
पुनर्परीक्षार्थी ( रिपीटर ) निकालाची टक्केवारी : 44.33 टक्के
खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 82.39 टक्के
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 93.43 टक्के

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती