पुणे : अमेरिकन व्यक्तीने शेतकऱ्यांसाठी बनवला मायक्रो सोलर पंप, शेतकऱ्यांची वर्षभरात किती होते बचत

0
1

आधी सुरु केला स्टार्टअप मुळचे अमेरिकन असलेले कॅटी टेलर आणि व्हिक्टर लेस्नीवस्की यांनी खेतवर्क नावाने स्टार्टअप सुरु केले. MIT मध्ये शिक्षण घेत असताना मास्टर पदवीच्या माध्यमातून ते टाटा ट्रस्टसोबत काम करु लागले. मग भारतीय शेतकऱ्यांसाठी त्यांनी स्टार्टअप सुरु केले. शेतकऱ्यांसाठी काम करण्यापूर्वी ते ओडिशा आणि झारखंडमधील शेतांमध्ये गेले. अनेक महिने त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद केला.

साकारला मायक्रो सोलर पंप

शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर व्हिक्टर यांना अडचणी समजल्या. शेतीला पाणी पुरवठासाठी विजेची समस्या दिसली. तसेच सोलार पंपची शेतातून चोरी होण्याच्या घटना दिसल्या. मग त्यांनी यावर विचार सुरु केला. नवीन प्रकल्पावर काम सुरु केले. त्यासाठी फंडीग जमा केला. भारत सरकारकडून मायक्रो सोलर पंपचा आरखडा मंजूर करणे, पेटेंट घेणे, पुणे शहरात युनिट उभे करण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर मायक्रो सोलार पंप सुरु झाला.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

९०० पंपची निर्मिती

खेतवर्क्सने आतापर्यंत ९०० पंपचे वाटप शेतकऱ्यांना केले. हा पंप मायक्रो असल्याने रोज शेतात घेऊन जाणे सोपे झाले. यामुळे सोलार पंपची चोरीची समस्या सुटली. हा पंप महिलाही सहज घेऊन जाऊ शकतात. या पंपमुळे शेतकऱ्यांचे वर्षातील दहा ते बारा हजार रुपये विजेचे बील वाचत आहे. अनेक शेतकरी या पंपचा वापर करु लागले आहे. विदेशातील लोकांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या या स्टार्टअपचे कौतूक होत आहे.