कर्नाटकमध्ये हा ‘सोलिल्लादा सरदारा’ काँग्रेसच्या विजयाचा ‘सिकंदर’ ज्यामुळे भाजपचा पराभव

0

10 वर्षे देशाचे पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग यांनाही भाजपच्या ‘त्या’ संकल्पनेच्या लढाईला सामोरे जावे लागले होते. गांधी घराण्याचे पाळीव आणि सर्वात कमकुवत पंतप्रधान अशी त्यांची अवहेलना करण्यात आली होती. पण, 2009 मध्ये त्याच कमकुवत म्हणून हिणवल्या गेलेल्या मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विजय मिळवला होता. त्याचीच काहीशी पुनरावृत्ती कर्नाटकमध्ये झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुक निकालामुळे काँग्रेस पक्षात एका व्यक्तीचा मान मात्र कमालीचा वाढला आहे.

देशातील सर्वात जुन्या पक्ष असलेल्या काँग्रेसच्या सर्वोच्च पदावर येण्यासाठी सामाजिक लढाई लढावी लागते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेही तेच झाले. मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि तेव्हापासून भाजपने त्यांच्यावर गांधी घराण्याचे वर्चस्व असल्याचा आरोप करत त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

भाजपने मल्लिकार्जुन खर्गे हे केवळ शिक्का आहेत. शेवटची गोष्ट गांधी घराण्यातील मानली जाते, अशी टीकाही केली होती. पण, कर्नाटकमध्ये विजय खेचुन आणत खर्गे यांनी टीकाकार भाजपला चोख प्रत्युत्तर दिले. काँग्रेस अध्यक्ष म्हणून खर्गे यांची ही पहिलीच मोठी निवडणूक आणि ती जिंकून त्यांनी काँग्रेस नेत्यांचा विश्वास सार्थ ठरविला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना कर्नाटकमध्ये ‘सोलिल्लादा सरदारा’ अर्थात अजिंक्य योद्धा मानले जाते. खर्गे यांनी या निवडणुकीत एसएम कृष्णा, धरम सिंह आणि सिद्धरामय्या यांना पुढे केले. पण, व्यूहरचना खर्गे यांनी आखली होती. पक्षाचा सर्वात आक्रमक चेहरा म्हणून खर्गे या निवडणुकीत विरोधकांसमोर आले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

खर्गे यांनी उदारमतवादी आणि दलित टॅगचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. त्यांच्या ‘विषारी साप’ या विधानाचा मुद्दा भाजपने काढला. त्यालाही खर्गे यांनी चतुराईने उत्तर देत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. खर्गे यांनी कर्नाटकातील विजयाने पक्षात आपली प्रतिमा नक्कीच मजबूत केली आहे. शिवाय या विजयासह त्यांनी आपल्या होमपीचवर आपणच ‘सिकंदर’ असल्याचे सिद्ध केले