ऐन लग्नाची लगभग सुरू असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0

आशुतोष तिवारी (मध्य प्रदेश), 26 एप्रिल : भाजप नेते कमलेश्वर सिंह यांच्या एकुलत्या एक मुलाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेने मध्य प्रदेशसह रेवा जिल्ह्यात धक्का बसला आहे. या घटनेमुळे रेवा परिसरात शोककळा पसरली आहे. कमलदेव सिंग यांना वयाच्या 30 व्या वर्षी अचानक हृदयविकाराचा झटका आला.

यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान कमलदे यांचा विवाह 6 जूनला होणार होता यासाठी ते तयारी करत होते. मात्र लग्नाआधीच कमलदेव यांना ह्रदयविकाराचा धक्का बसल्याने घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे चार वाजता कमलदेव यांच्या अचानकछातीत दुखू लागलं. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे याआधी त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. नेहमी प्रमाणे ते आपला रुटीनसाठी उठले होते.

कमलदेव यांना सकाळी झटका आल्याने त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो गंभीर अवस्थेत असल्याने त्याचा धोका कायम होता. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी कमलदेव यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या निधनाने खैरहान गावात शोककळा पसरली आहे. दुपारनंतर, त्यांच्या मूळ गावी त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी हजारो लोक उपस्थित होते. या अंत्ययात्रेत विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते सहभागी होते. भाजपच्या नेत्यांनी मंत्र्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?