2024 कशाला? आताच मुख्यमंत्रीपदावर क्लेम करतो!

0
2

आगामी विधानसभा निवडणुकीत 2024ला मुख्यमंत्री पदावर क्लेम करणार का, या थेट प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 2024ला कशाला? आताच मुख्यमंत्री पदावर क्लेम करायला तयार आहे, असे विधान केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीत अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत पुन्हा एकदा भाष्य केले. ते म्हणाले, 2004मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता. तेवढे संख्याबळ पक्षाकडे होते; परंतु काही निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात. पक्षाची शिस्त पाळावी लागते. त्या वेळी पक्षाचे नेते म्हणून आर.आर. पाटील यांची निवड केली होती. संधी मिळाली असती तर ते मुख्यमंत्री झाले असते. मात्र आम्हाला संधी मिळाली नाही. 2024ला मुख्यमंत्री पदावर क्लेम करणार का, असा प्रश्न विचारताच 2024 कशाला? आताच मुख्यमंत्री पदावर क्लेम करतो, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आनंदाने काम केले
अजित पवार चार वेळा उपमुख्यमंत्री झाले. यादरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच्या अनुभवांबद्दल विचारले असता, अजित पवार म्हणाले, सरकारमध्ये असताना कधी समाधानाने, तर कधी नाइलाजाने काम करावे लागते. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आनंदाने काम केले, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात नाइलाजाने काम करावे लागले, असे त्यांनी परखडपणे सांगितले.