पुणेरी डार्क चॉकलेटची जगभराला भुरळ

0
3

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड येथे तयार होणाऱ्या चाॅकलेटने जगभरातील खवय्यांना भुरळ घातली आहे. मार्स रिगले या अमेरिकन कंपनीने आता खेड येथे Galaxy Fusion या डार्क चॉकलेटचे उत्पादन सुरू केले आहे. कंपनी येत्या पाच वर्षांत आपली गुंतवणूक दुप्पट करणार आहे.

चाॅकलेट, मिंट, च्युइंगम आणि कन्फेक्शन क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या मार्स रिगलेने भारतातील आपली स्थानिक उत्पादन आणि गुंतवणूकही वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून खेड (पुणे) येथील कंपनीत प्रथम Galaxy Fusion या डार्क चॉकलेटचे उत्पादन सुरू केले असून त्याची विक्री भारतीय बाजारपेठेसोबतच जगभरात केली जाणार आहे. २०१६ मध्ये कंपनीने खेड येथील प्लांट मधून स्निकर्स या चाॅकलेटचे उत्पादन सुरू केले. त्यानंतर स्निकर्स, गॅलेक्सी, बूमर. आदी उत्पादने सुरू केली. ही सर्व उत्पादने जगभरात लोकप्रिय ठरली असून, आता डार्क चॉकलेटचे उत्पादन सुरू केले आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

मार्स रिगले इंडियाचे सरव्यवस्थापक कल्पेश परमार म्हणाले की, कोरोनानंतर एकूणच पॅकेज फूड इंडस्ट्रीजच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यातही चाॅकलेटची मागणी जगभरात वाढत आहे. मार्सने एकूणच भारतातील तीनही कंपन्यांमध्ये नवनवीन उत्पादने घेत त्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आतापर्यंत सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून येत्या तीन ते चार वर्षांत ती दुप्पट होईल. खेड येथील कंपनीचा लवकर विस्तार करण्यात येईल. सध्या डार्क चॉकलेट खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. सारखेच कमी प्रमाण आणि ७० टक्के कोको असणाऱ्या डार्क चॉकलेट मध्ये फायबर, आर्यन, मॅग्नेशियम झिंक, पोटॅशियम, फाॅस्फरस असे आरोग्यदायी घटक असतात, अशी माहिती कंपनीचे विपणन संचालक वरुण अंधारी यांनी दिली.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला