‘माझे शरीर विकून त्यांनी कोट्यवधी कमवले, मी आता थकलीये.’; ‘त्या’ मुलीने व्हिडिओ जारी करत मागितली मदत

0

देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही मोठ्या आहेत. त्यात आता राजस्थानच्या भिलवाडा येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

भिलवाडा : देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Crime Increasing) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही मोठ्या आहेत. त्यात आता राजस्थानच्या भिलवाडा (Bhilwada Crime) येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मुलीने दहा वर्षांची असताना विकल्याचे सांगून देहव्यापाराचे प्रकरण उघडकीस आणले आहे. हा प्रकार राजस्थानच्या भिलवाडा येथे घडला.देहव्यापाराच्या दलदलीत सापडलेल्या मुलीने एक व्हिडिओ जारी करत अनेक गोष्टींवर मत मांडले. यामध्ये तिने म्हटले की, ‘मी 10 वर्षांची असताना मला माधोपूरला विकले गेले. 11 व्या वर्षी मला व्यवसायात ढकलण्यात आले. एक-दोन वर्षे तिथे ठेवल्यानंतर माझी विक्री झाली. टोंकच्या देवळी तहसील पोलाडा येथे किशनच्या जागेवर 8-9 वर्षे व्यवसाय केला. यानंतर भुसावळ, मुंबई, जयपूर या ठिकाणी जाऊन कोट्यवधी रुपये त्यांनी कमावले’.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

20 लाखांना विकले

या पीडितेने पुढे सांगितले की, ‘किशनने मला विकत घेतले होते. शंभू आणि प्रेमने माझा खूप छळ केला. ते अनेक मुलींना विकतात. मलाही विकले. त्याने अनेक बहिणी आणि मुलींवर अत्याचार केले. किशनने मला 20 लाख रुपयांना विकत घेतले. त्यांनी मला 8-9 वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय करायला लावला’.

अनेक यातना सहन केल्यात

‘मी खूप यातना सहन केल्या आहेत. या अत्याचारांना मी कंटाळली आहे. त्यांच्या भीतीने मी लपून बसले आहे. मला न्याय द्या, मी खूप थकली आहे. त्यांनी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले. सरकारने मला न्याय द्यावा, अशी माझी विनंती आहे. मी लपून बसले आहे. मला गावी यायचे नाही. माझं बालपण, माझं आयुष्य उद्धवस्त केलं. भीतीपोटी कोणी बोलत नाही हे तुम्हा लोकांना माहीत आहे. मला आधार द्या’, असेही तिने यामध्ये म्हटले आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता