…फक्तं रासनेंवर पराभव ढकलता येणारं नाही! हे कसब्यातील पराभवास जबाबदार? संजय काकडे

संजय काकडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह स्वत:ला जबाबदार धरले.

0

मागील चाळीस वर्षे अबाधित असलेला भाजपचा कसब्याचा गढ काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांच्या विजयाने कोसळला आहे. त्यानंतर भाजपच्या या पराभवाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी या पराभवाला आपल्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील भाजपचे नेतृत्व जबाबदार असल्याचे म्हणत पक्षाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलीय. त्यामुळे लवकरच पुणे भाजपमधे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याच्या आणि देशाच्याही राजकारणात कितीही बदल झाले तरी मागील चाळीस वर्ष कसबा पेठ मतदारसंघावर भाजपचा झेंडा कायम होता. मात्र, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभार पहात असताना यावेळेस कॉंग्रेसच्या रविंद्र यांनी भाजपकडून कसबा हिसकावून घेतला. भाजपच्या या धक्कादायक पराभावानंतर पक्षाकडून कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्‍यता आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी या पराभवास आपल्यासह पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पुणे भाजपचं नेतृत्व करणारे नेते जबाबदार असल्याचं म्हटलय. परंतु, भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी या पराभवाला आपला पक्ष जबाबदार नसून आपणच कमी पडल्याचं म्हटलं आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

हेमंत रासने यांच्यावर पराभवाची जबाबदारी ढकलून चालणार नाही याची भाजपच्या नेतृत्वाला पुरेपुर कल्पना असल्याचं बोलं जातंय. कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे 16 नगरसेवक असताना देखील हेमंत रासने कुठेही आघाडी घेऊ शकले नाहीत. पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे भाजपचे सर्वच नेते या निवडणुकीत अपयशी ठरले आहेत. मात्र सर्वात मोठी जबाबदारी होती ती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे देखील अपयशी ठरल्याचं संजय काकडेंनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी मात्र या पराभवाचं आत्मचिंतन करु असं म्हणत वेळ मारून नेहली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावात निर्माण झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजपची ज्या वेगाने वाढ झाली त्याचपद्धतीने पुण्यातही भाजप वाढला. पण समोर तगडा उमेदवार असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी स्थानिक नेतृत्व देखील तेवेढच सक्षम हवं याची जाणीव भाजपला कसब्याच्या निकालाने झालीय. त्यामुळेच पुणे भाजपमधे लवकरच मोठे फेरबदल होण्याचे संकेत वर्तवले जात आहेत.