….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!

• कार्यकर्त्यांना ‘वारजे बदलतंय!’ कार्यकर्त्याचंच घर जळतंय! हे म्हणण्याशिवाय पर्याय राहिला नाही • मुंबईच्या 'राम'कृपेने स्व. सोनेरी आमदार कन्येचही घोड गंगेत न्हालं!

0

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला खडकवासला (फक्त विधानसभेपुरता मर्यादित न ठेवता) आणखी भक्कम करण्याच्या दृष्टीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘ॲक्टिव्ह’ होत वारजे माळवाडी परिसरामध्ये कट्टर विरोधक असलेल्या बाहुबली नेत्यांना एकत्र विसावण्याची किमया शक्य केली असल्याने होय वारजे बदलतंय आणि भाजपचा प्लॅन ‘बी’ यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल. वारजे माळवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘प्राबल्य’ लक्षात घेऊन तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याने ‘वारजे बदलतंय!’ असं भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांना स्वाभिमानाने म्हणता येईल अशी परिस्थिती पक्षाने कार्यकर्त्यांवर आणून ठेवली आहे.

लोकायतची भविष्यवाणी –

वारजे बदलतंय! शुभारंभ आणि संभ्रम एकाचवेळी लागलेल्या फ्लेक्सचीच चर्चा; भाजपची ‘प्लॅन बी’ चाचपणी?

वारजे बदलतंय! शुभारंभ आणि संभ्रम एकाचवेळी लागलेल्या फ्लेक्सचीच चर्चा; भाजपची ‘प्लॅन बी’ चाचपणी?

वारजे माळवाडी परिसरावर आपलं अधिराज्य असावं यासाठी विद्यमान विजयी चौकार मारलेल्या आमदारांचा प्रखर विरोध असतानाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘पैलवान’ गटातील ‘सलगी’चा उपयोग करून निवडणुकीपूर्वीच वारजे माळवाडी काबीज करण्याचा प्लॅन बी यशस्वी आहे की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसापूर्वी परिसरामध्ये वारजे माळवाडी चा मुख्य चौक असलेला तिरंगा झेंडा चौकात ‘आम्ही येतोय प्रभाग क्रमांक 32 च्या जनतेसाठी हितासाठी…..’ या आशयाचे लागलेलं फलक आज सत्यात उतरलं! असलं तरी सुद्धा कट्टर विरोधक माजी नगरसेवकाच्या एकाच वेळी तीन विभिन्न चेहरे एकाच दिवशी एकाच एकाच व्यासपीठावर एका झेंड्याखाली भाजपवासी झाल्याने परिसरामध्ये मात्र खमंग चर्चेला उधाण आले.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

वारजे माळवाडी परिसरामध्ये पक्षाच्या वतीने पुणे महापालिका सर करण्यासाठी संपूर्ण प्रभागाची रणनीती आखताना शेवटच्या क्षणापर्यंत सर्व काही अंधारात ठेवलं होते. ‘घरंदाज राजकारणी’ आणि पैलवान गट ‘सलगी’ दोघांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू यशस्वी केला. त्यातच मुंबईतील ‘राम’कृपेमुळे स्व. सोनेरी आमदार कन्येचही घोड गंगेत न्हालं! त्यामुळे गेली सात आठ वर्षांपासून वारजे माळवाडी परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे घराघरात काम पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पदरी मात्र निराशाच आली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘प्लॅन बी’ यशस्वी केल्याच्या ‘वल्गना’ करण्यात आल्या तरी सुद्धा सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला! होत राहणार! …हा संदेश मात्र संपूर्ण शहरांमध्ये गेला याची कुणालाच खंत नाही हे विशेष उल्लेखनीय आहे.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

भाजपाच्या हे गळाला कार्यकर्त्याची गळचेपी?

वारजे माळवाडी भागात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विद्यमान माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, सायली वांजळेच भाजपावासी झाल्याने गेली अनेक वर्ष विभिन्न प्रयोग केलेल्या पक्षाला निवडणुकीपूर्वी यश आले आहे. माजी नगरसेवक अन विद्यमान आमदारांचे खास अधिकार असलेल्या किरण बारटक्के, शेजारच्या प्रभागामध्ये पराभव झाल्यानंतरही या भागांमध्ये सक्रिय वासुदेव भोसले अन् पुणे शहरात सहकार आघाडीचे जाळे निर्माण करणारे सचिन दांगट यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना ‘वारजे बदलतंय!’ कार्यकर्त्याचंच घर जळतंय! हे म्हणण्याशिवाय पर्याय राहिला नाही. वारजे माळवाडी परिसरातील ‘अनुसूचित जाती’साठीची उर्वरित एक जागाही राष्ट्रवादीच्या आयात उमेदवारांच्या मर्जीनेच दिली जाण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही. सध्याचे लोकप्रतिनिधींचे गणित पाहता घड्याळाकडे २ अन् तर तुतारीचे 1 (सलग दोनदा विधानसभा नशीब आजमावलेले) असे बाहुबली चेहरे भारतीय जनता पक्षाकडे आले आहेत. भारतीय जनता पक्षाने धक्कादायक घडामोडी घडवल्याने कार्यकर्त्यांच्या नाराजीतून वेगळ्याच गणिताची जुळवाजुळव सुरू झाली आहे. प्रबळ लढतीसाठी सच्चे कार्यकर्ते एकत्र आल्यास या अनुभवी माजी नगरसेवकांना जशास तसे लढतीमध्ये टक्कर देण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘नवसंजीवनी’ देण्याचा गोंडस नावाखाली जो उद्योग केला आहे त्याला मतदार काय उत्तर देतात हे पाहण्यासाठी फक्तं काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!