कर्वेनगरच्या 2 हजार लाडक्या बहिणी ‘भवानीमाते’च्या चरणी; ‘नवे पर्व सोबत सर्व’ने शुभ आरंभ

0

कर्वेनगर भागातील दोन हजार लाडक्या बहिणीच्या साक्षीने तुळजाभवानी मातेच्या चरणी गेलेल्या वीरेश शितोळे नवे पर्व सोबत सर्व अशी उद्घोषणा करत पुणे महापालिकेच्या नव्याने जाहीर झालेल्या कर्वेनगर प्रभाग 30 मध्ये परिवर्तन करण्याचा संकल्प केला आहे. कर्वेनगर भागातील एक विनम्र स्नेह प्रिय मितभाषी स्वच्छ युवा चेहरा अन लाडक्या बहिणींचा हक्काचा आधार विरेश शितोळे तेच असल्याची जाणीव या तीर्थयात्रा सहलीच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवली. लोकप्रतिनिधी होण्यासाठी कर्वेनगर भागामध्ये भलेभले आपली स्व: हिताची गणिते जुळवण्यासाठी विविध पक्षांचे उंबरठे झिजवत असताना विक्रमी महिलांसह वीरेश शितोळे यांनी केलेला शुभारंभ चर्चेचा विषय बनत आहे.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

कर्वेनगर परिसरामध्ये निवडणुकीचा विचार न करता कायम जनसंपर्क आणि विविध स्तरातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी केले जाणारे कार्य आज घराघरांमध्ये पोहोचलेले असताना येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ‘प्रभावी’ वाटचाल सुरू झाली आहे. कर्वेनगर परिसरामध्ये विरेश शितोळे नावाचे वलय उभे राहिल्याची जाणीव तीर्थयात्रा सहलीव दरम्यान झाली.

संपूर्ण तीर्थयात्रा सहलीच्या दरम्यान राजमुद्रा प्रतिष्ठानच्या मार्फत प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातून आलेल्या प्रत्येकासाठी विरेश शितोळे मित्र परिवाराच्या वतीने विशेष काळजी घेण्यात आली असल्याने संपूर्ण प्रभागांमध्ये त्यांच्या विशेष नियोजनाची विशेष प्रसंशा करण्यात आली. विरेश शितोळे यांनी पुणे शहरातील यशस्वी देवदर्शन यात्रा कर्वेनगर परिसरातून केल्याचे यात्रेत सहभागी झालेल्या माता भगिनींनी जाहीरपणे सांगितले.

अधिक वाचा  पुणे भाजपच्या दुटप्पी भूमिकेने शिवसेनेपुढे प्रश्नचिन्ह?; पदरात तोकड्याच जागा अन् त्याही एकदम कडक पाषाण