संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या वेगळेपणाने आपुलकीने आणि जिव्हाळ्याने मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवलेल्या आणि २००० प्रयोगांचा टप्पा पार केलेला सलील कुलकर्णी-संदिप खरे प्रस्तुत… आयुष्यावर बोलू काही! ची सांस्कृतिक पर्वणी बावधनमधील नामांकित राष्ट्रसेवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आली आहे. बावधन भागातील सांस्कृतिक परंपरा विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी आयुष्यावर बोलू काही या अविस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.






महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते महसूल मंत्री.ना. चंद्रशेखरजी बावनकुळे महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून यावेळी मा.ना. मुरलीधर अण्णा मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री- भारत सरकार, मा.श्री. भीमरावआण्णा तापकीर आमदार खडकवासला विधानसभा, मा. राजेशजी पांडे सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र प्रदेश, मा. श्री. सिद्धार्थजी शिरोळे आमदार शिवाजीनगर, मा.श्री. प्रदिपदादा रावत मा. खासदार पुणे शहर, मा.ना. चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, मा.श्री. धीरजजी घाटे शहराध्यक्ष भा.ज.पा. पुणे, मा.श्री. सुनिलजी कांबळे आमदार पुणे कॅन्टोन्मेंट, मा.श्री. हेमंतजी रासणे आमदार कसबा विधानसभा, मा.श्री. गणेशजी बिडकर मा. सभागृह नेते, पुणे मनपा, मा.श्री. मनिषाताई लडकत महिला अध्याश, भाजपा पुणे शहर उपस्थित राहणार आहेत.
बावधन परिसरात होणाऱ्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सलील कुलकर्णी यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी त्याच्या विशेष सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले असून आज संध्याकाळी वेळ: सायं. ६ वा. छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण एल.एम.डी चौक, बावधन, पुणे येथे दिलीप वेडेपाटील संस्थापक-अध्यक्ष राष्ट्रसेवा प्रतिष्ठान मा. नगरसेवक पुणे म.न.पा. यांच्यावतीने अविस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये परिसरातील सन्माननीय व्यक्तिमत्त्वांना बावधन-कोथरुड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये जगद्गुरु कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज (पुणेकर राष्ट्रीय कीर्तनकार), मा.श्री.एन.डी. मारणे सर (अध्यक्ष महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे), मा. सौ. सुचित्रा साठे (संस्थापक-श्री विद्या भवन हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज), मा. कु. ऋवेद ज्ञानेश्वर बारगुजे (नॅशनल चॅम्पियन रेसिंग), मा.सौ. तेजस्विनी सावंत (इंडियन शूटर ऑलम्पियन), मा.श्री. मनोज येरंडे, (खासदार किडा महोत्सव संयोजक), मा. अॅड. पी. नारायण (कायदेतज्ञ), मा.श्री. राजेंद्र बांदल (संचालक-पैरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल), मा. कु. महेश नानगुडे (ISPL क्रिकेटर), मा. सौ. अस्मिता चिंचाळकर (अभिनेत्री), मा. श्री. अनिल पंचवाघ (१९७२ पासून संघाचे स्वयंसेवक), मा.डॉ. किरण कुर्तकोटी (डायरेक्टर- कुर्तकोटी नर्सिंग होम), मा. सौ. अश्विनी नायर (आदर्श माता) यांचा गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी मा.ना. माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रा. मेधाताई कुलकर्णी खासदार राज्यसभा, मा.श्री. योगेशअण्णा टिळेकर, आमदार विधान परिषद, मा.श्री.रविजी अनासपुरे महाराष्ट्र प्रदेश भा.ज.पा. मुख्यालय प्रभारी, मा.श्री. श्रीनाथजी भीमाले मा. सभागृह नेते, पुणे मनपा पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.













