पुणे पालिका निवडणुक कोथरूडच्या या प्रभागात सर्वाधिक मतदार तर सर्वात कमी पर्वतीच्या या प्रभागात 4000 मतदान केंद्रे 23500 कर्मचारी सज्ज

0

पुण्याची मतदारसंख्या ३५ लाख ५१ हजार ४६९ असून, महापालिका निवडणुकीसाठी ४ हजार मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. एकूण ४१ प्रभागांमध्ये सर्वांत जास्त मतदार कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोथरूड मंडळातील प्रभाग क्र. ९ बाणेर-बालेवाडी-पाषाणमध्ये १ लाख ५६ हजार ०३ असल्याने १७४ मतदान केंद्रे तयार झाली असून समाविष्ट गावांमधील आकडेवारी शहरीकरणामुळे अचानक वाढल्यामुळे पुणे शहरातील सर्वाधिक मतदार असलेला प्रभाग म्हणून तर प्रभाग क्र.३९ अप्पर सुपर इंदिरानगरमध्ये सर्वांत कमी म्हणजे ६० हजार ८४४ मतदार असल्याने मतदार केंद्रे ६८ असणार आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकरिता एकूण २३ हजार ५०० कर्मचारी आणि अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मतदानासाठी बॅलेट मशीन १३ हजार २०० तर कंट्रोल युनिट ४ हजार ४०० असणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

पुणे महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग हे चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये सुमारे १५०० अधिकारी आणि कर्मचारी तसेच मतदान प्रक्रियेकरिता प्रती मतदान केंद्रासाठी १ केंद्राध्यक्ष, ३ मतदार अधिकारी, १ शिपाई असणार आहेत. एक निवडणूक निर्णय अधिकारी, तीन साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी याप्रमाणे प्रभागांचे वाटप केले आहे. त्यामुळे १५ क्षेत्रीय कार्यालयाप्रमाणे १५ निवडणूक निर्णय अधिकारी आणि ४५ साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण मतदानासाठी बॅलेट मशीन १३ हजार २०० असणार असून कंट्रोल युनिट ४ हजार ४०० आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या http//mahasecvoterlist.in/ वेबसाईटवर Search name in voter list या टॅबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव शोधण्याची सुविधा देण्यात आली आहे.

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

थकबाकी नसल्याचा दाखला २४ तासात ऑनलाईन मिळणार

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना थकबाकी नसल्याचा दाखला (एनओसी) द्यावा लागतो. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने या दाखल्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यावेळी उमेदवाराचे आधारकार्ड, प्रॉपर्टी नंबर द्यावा लागणार आहे. घरी बसून थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र डाउनलोड करता येणार आहे. थकबाकी नसल्यास २४ तासात ऑनलाईन एनओसी मिळणार आहे.

खर्चाची मर्यादा १५ लाख रुपये

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी एका उमेदवाराला खर्चाची मर्यादा १५ लाख रुपये निश्चित केली आहे. दैनंदिन निवडणूक खर्चाचा हिशोब उमेदवाराने दर दिवशी दुपारी दोन वाजता सादर करावा लागणार आहे.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

मतदान केंद्राची यादी २० डिसेंबर प्रसिद्ध होणार

पुणे महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. त्यामुळे एका मतदान केंद्रावर सुमारे ९०० मतदार असणार आहेत. या मतदान केंद्राची यादी २० डिसेंबर रोजी तर मतदान केंद्रनिहाय यादी २७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

उमेदवारी अर्जासाठी मदत कक्ष

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र भरताना अडचण येऊ नये त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या माध्यमातून मदत कक्ष तयार केला जाणार आहे.