कोथरुड मतदारसंघातील वाचकांसाठी विशेष सवलत योजना; ना. चंद्रकांतदादा पाटील यांची वाचनप्रेमीसाठी  आनंदाची बातमी

0

पुणे पुस्तक तिसऱ्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुडकर वाचनप्रेमींसाठी आनंदाची भेट देऊ केली आहे. कोथरुडकर वाचकांसाठी विशेष सवलत योजना घोषित केली असून, त्याचा कोथरुडकरांनी आवश्य लाभ घेण्याचे आवाहन ना. पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’ १३ ते २१ डिसेंबर २०२५ दरम्यान फर्गुसन कॉलेज येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त वाचकांनी भेट देऊन; आपल्या आवडत्या पुस्तकांचा मनमुराद आनंद लुटावा; यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

ना. पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील वाचकांनी पुस्तक खरेदी करावी; यासाठी विशेष सवलत योजना राबविली असून, एकूण पुस्तक खरेदीवर १०० रुपयांची विशेष सवलत देऊ केली आहे. यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष कुपन उपलब्ध करुन दिले असून, दिनांक १२ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२५ दरम्यान, ना. पाटील यांच्या सर्व जनसंपर्क कार्यालयात सायंकाळी ४ ते ७ यावेळेत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना. पाटील यांनी यानिमित्ताने केले आहे.