विरोधी पक्षनेते पद न दिल्याने विरोधक आक्रमक तरीही इच्छा अपूर्णच? विधानसभा अध्यक्षांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

0

“विरोधी पक्षनेते पद निवडताना एकूण सदस्यसंख्येच्या 10 टक्के आमदार हवे, अशी अट कायद्यात नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. ही सत्य परिस्थिती नाही. केंद्राच्या कायद्यानेच ही 10 टक्क्यांची अट घालण्यात आली आहे”, असे विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बोलताना दिले. विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. मात्र विरोधीपक्षनेते पदच निवडण्यात आले नसल्याने विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधीपक्षनेतेपद घटनात्मक पद आहे. या पदासाठी 10 टक्के आमदार हवे, अशी कुठलीही अट नाही. विधिमंडळाच्या सचिवांनीच तसे लेखी पत्र आपल्याला दिले असल्याचे आमदार भास्कर जाधव म्हणाले.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!

“२८८ आमदारांपैकी २९ आमदार नसल्याने आम्हाला विरोधीपक्षनेते पद दिले जात नाही. मात्र सरकारने आम्हाला अशी अट दाखवा. विधिमंडळ अधिनियमात अशी तरतूद असेल तर ती दाखवा”, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. “विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती नेमून लोकशाहीचा सन्मान करावा”, असेही जाधव म्हणाले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संख्याबळ मिळवा आणि विरोधीपक्षनेतेपद घ्या, असे विधान केले. सोमवारी राहुल नार्वेकर यांनीही संख्याबळ महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

“या विषयावर आम्ही कायदेशीर मत घेऊ. या अधिवेशन काळातच याबाबतचा निर्णय होऊ शकेल”, असे संकेतही त्यांनी दिले. “अधिवेशनात विरोधकांनी बोलण्यासाठी योग्य वेळ दिला जाईल, मात्र सभागृहाचा वेळ वाया जाणार नाही, याची काळजी घेऊ”, असे नार्वेकर म्हणाले.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

‘एन कुमार’च्या जागेची गरज नाही

“विधान भवन नागपूरच्या विस्तारीकरणांतर्गत नवीन इमारत बांधकाम प्रकल्प निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध विभागांची परवानगी आणि मंजुरीची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. नवीन विधान भवनाचे नियोजन पूर्ण झाले आहे. सध्या प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू आहे”, असे राहुल नार्वेकर म्हणाले.

“एन कुमारच्या जागेची किंमत अधिक आहे. सध्या त्या जागेची गरज नाही. पर्यायी जागा मिळाली आहे. सेंट्रल हॉलही तयार करण्यात येणार आहे. प्रशासकीय ब्लॉक तयार करण्यात येत आहे. एन कुमारच्या इमारत अर्धवट आहे. याबाबत नगरविकास विभागाने घेण्याची गरज आहे”, असेही नार्वेकर म्हणाले. प्रस्तावित इमारत एकूण चार ब्लॉकमध्ये बांधण्यात येणार आहे. विस्तारीकरणामध्ये एकाच इमारतीत विधानसभा, विधानपरिषद, सेंट्रल हॉल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती, मंत्र्यांची दालन, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते आदींची दालने असणार आहेत.

अधिक वाचा  पुण्यात भाजपा मित्र पक्षाला मोठा धक्का; भाजपलाही धक्कादायक प्रवेशामुळे ही नवी भिती! एकावेळी २०० कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा