विधानभवनात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’! निवडणुकीत तुटून पडलेले समोरासमोर आले अन् माध्यमकर्मीही चक्रावले

0

गेल्याच आठवडयात शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मालवणमधील नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. या वादातूनच निलेश राणे यांनी बंधू नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे निवडणूक काळातच वातावरण चांगलेच तापले होते. तर दुसरीकडे निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माणही झाला होता. मात्र, निवडणुका संपताच हा दोघांतील वादावर पडदा पडला असून नागपुरात विधानभवन परिसरात सोमवारी निलेश राणे-रवींद्र चव्हाण समोरा-समोर आले. त्यांच्या भेटीनंतर विधानभवनाबाहेर ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पहावयास मिळाला.

मालवण नगरपरिषद निवडणुकीच्यानिमित्ताने भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यातील संघर्षाची चर्चा सर्वत्र झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटप केल्याचा थेट आरोप निलेश राणे यांनी केले होते. यानंतर रवींद्र चव्हाण यांनी देखील आरोप फेटाळत निलेश राणेंना प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे या दोन नेत्यांमधील वाद चांगलाच रंगला होता.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये गेल्या काही दिवासांपासून तणाव निर्माण झाला होता. तसेच निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केल्यानंतर मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी हल्लाबोल केला. या सगळ्या प्रकरणानंतर सोमवारी नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हे समोरा-समोर आले होते.

सोमवारी दुपारी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनावेळी निवडणुकीत भाजपवर तुटून पडणारे निलेश राणेंसमोर रवींद्र चव्हाण आले अन् दोघांनी यावेळी विधीमंडळ परिसरात हसतखेळत भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये गळाभेटही झाली. या भेटीनंतर माझे आणि रवींद्र चव्हाण यांचे काहीही वितुष्ट नाही. जे काही होते ते निवडणुकीपुरते होते, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली. यावेळी रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, असेही निलेश राणे यांनी सांगितले.

अधिक वाचा  पुण्यात भाजपा मित्र पक्षाला मोठा धक्का; भाजपलाही धक्कादायक प्रवेशामुळे ही नवी भिती! एकावेळी २०० कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा

मालवणमधील निवडणुकीदरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी 26 नोव्हेंबर मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत किनवडेकर यांच्या राहत्या घरी पोहोचले. यावेळी निलेश राणेंना विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली. किनवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये मिळाले. यानंतर निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती.

पैसे वाटप करुन निवडणूक लढवायची पद्धत आहे का? मैदानात येऊन लढा. त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत, असा आरोपही निलेश राणेंनी केला. दरम्यान, बेकायदेशीरपणे घरात घुसल्याची तक्रार विजय केनवडेकर यांनी मालवण पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन नगरपालिका निवडणूक काळात राणे-चव्हाण या दोन नेत्यांमधील वाद चांगलाच रंगला.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य