कर्वेनगर प्रभाग 30 लढतीचे चित्र बदलले; युवा ‘छावा’ मैदानात १० हजार लाडक्या बहिणींसह ‘भवानीमाते’च्या चरणी

0

पुणे महापालिकेच्या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये कर्वेनगर प्रभाग 30 म्हणजे कोणताही बदल न होता ‘सेम टू सेम’ हद्दी राहिलेला एकमेव प्रभाग! मागील निवडणुकीमध्ये ३:१ मतकौल असलेल्या प्रभागामध्ये भले-भले परिवर्तनाच्या नावाने सक्रिय झाले; परंतु स्वच्छ चरित्र युवा चेहरा अन लाडक्या बहिणींचा हक्काचा आधार विरेश शितोळे यांनी सक्रिय होत कर्वेनगर भागातील लढतीचे चित्र बदलले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (३) विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष(१) व महायुती मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यावतीने फक्त आणि फक्त चाचपणी सुरू असताना युवा ‘छावा’ मैदानात उतरला असून परिसरातील १० हजार लाडक्या बहिणींसह ‘भवानीमाते’च्या चरणी आशीर्वाद घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

कर्वेनगर परिसरामध्ये अनेकांची गेली चार वर्ष ‘भावी’ची दिवास्वप्ने रंगत असताना सामाजिक पिंड अन सलोख्याची भावना जपत कार्यरत असलेल्या ‘प्रभावी फक्त एकच!’ म्हणत कर्वेनगरच्या राजकीय गणिताची जुळवा-जुळव बदलून टाकण्याचे काम केले आहे. मुळात विनम्र स्वभाव मितभाषी आणि गोरगरिबांच्या मदतीला यथा शक्य उपयोगी पडत असल्याने परिसरामध्ये विरेश शितोळे नावाचे वलय उभे राहिले आहे. याच स्नेह परिवाराच्या साथीने पुणे महापालिकेच्या रणांगणात उतरण्यासाठी राजमुद्रा प्रतिष्ठानच्या मार्फत ‘प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी – विरेश शितोळे’ घोषउद्गाराने शुभारंभ करण्यात आला आहे.

कर्वेनगर प्रभाग 30 मध्ये विरेश गोरखनाथ शितोळे (अध्यक्ष : राजमुद्रा प्रतिष्ठाण) कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी, विरेश शितोळे मित्र परिवार यांच्यातर्फे  प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी येथील १०,००० माता भगिनींसाठी महिला भाविकांसाठी मोफत क्षेत्र तुळजापुर श्री तुळजाभवानी दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. कर्वेनगर भागातील महिला भगिनींचा आपापसातील सन्मान आणि स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी सदरील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उत्साही प्रतिसाद मिळत आहे. पुणे शहरातील सर्वात मोठी देवदर्शन यात्रा कर्वेनगर परिसरातून शक्य असल्याचे आयोजक विरेश शितोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर