दिघी पोर्टवरून दरवर्षी 2 लाख वाहनांची निर्यात होणार; देशाचे नवीन ऑटोमोबाईल निर्यात केंद्र रायगड होणार

0

रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट हे लवकरच देशाचे नवीन वाहन निर्यात केंद्र होणार आहे. या बंदरातून दरवर्षी दोन लाख वाहनांची निर्यात केली जाणार आहे. मदरसन समुह आणि आदानी पोर्ट यांच्यात नुकताच एक सामजस्य करार झाला आहे. दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त भागीदारीतून दिघी येथे वाहन निर्यात केंद्र विकसित केले जाणार आहे.

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील आगरदांडा आणि श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे दिघी पोर्टची उभारणी करण्यात आली आहे. आदानी उद्योग समुहाकडून विकसीत करण्यात येत असलेल्या या दिघी पोर्ट लगतच्या परिसरात वाहन निर्मिती उद्योगाला चालना दिली जाणार आहे. त्याच बरोबर मुंबई पुणे येथील वाहन निर्मिती उद्योगांना दिघी पोर्ट मधून वाहनांची जलदगतीने निर्यात करणे सहज शक्य होणार आहे. त्यामळे राज्यातील वाहन उद्योगासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय मानला जात आहे.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

मदरसन समूहाच्या संयुक्त उपक्रम कंपनी समवर्धन मदरसन हामाक्युरेक्स इंजिनिअर्ड लॉजिस्टिक्स लिमिटेड आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड यांच्या दिघी पोर्ट लिमिटेडसोबत झालेल्या भागीदारीनंतर येथे अत्याधुनिक वाहन निर्यात सुविधा उभारली जाणार आहे. यात नवीन रोल-ऑन, रोल-ऑफ टर्मिनलची सुविधा असणार आहे. तयार वाहनांच्या लॉजिस्टिकची सर्व कामे एकाच ठिकाणी पार पडतील, ज्यामुळे प्रमुख ऑटोमोबाईल ओईएम कंपन्यांसाठी ऑपरेशन्स अधिक सोपे होतील. ग्राहकांना कार्गो ट्रॅकिंग सुविधाही या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या केंद्रातून दरवर्षी सुमारे दोन लाख वाहनांची निर्यात होण्याचा अंदाज असून रायगड जिल्हा देशाचे प्रमुख ऑटोमोबाईल लॉजिस्टिक्स हब बनेल असा विश्वास कंपन्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई-पुणे येथील वाहन निर्मिती उद्योगांना निर्यातासाठी हे सर्वात सोयीस्कर केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

अत्याधुनिक रोरो टर्मिनलची वैशिष्ट्ये

या नवीन सुविधा केंद्रात वाहन निर्यात प्रक्रियेतील सर्व टप्पे – यार्ड व्यवस्थापन, तपासणी (PDI), चार्जिंग, साठवण आणि जहाज लोडिंग – एकाच ठिकाणी पूर्ण होतील.

एसएएमआरएक्सच्या गुंतवणुकीनंतर ग्राहकांना 360-डिग्री कार्गो ट्रॅकिंग, पूर्ण लॉजिस्टिक समाधान आणि एआय-आधारित यार्ड व्यवस्थापन उपलब्ध होणार आहे.