निवडणुकी दरम्यान छगन भुजबळांचा अवमान अंगलट; राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यांची पक्षातून थेट हकालपट्टी

0

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, समता परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बिहार निवडणुकीदरम्यान अवमान करणे ओडिशा राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) प्रदेशाध्यक्षांना चांगलेच महागात पडले आहे. राजकुमार यादव यांची पक्षातून सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १६ जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीसाठी पक्षाने ओडिशा प्रदेशाध्यक्ष राजकुमार यादव यांची केंद्रीय निरिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. पक्षाध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत प्रचार साहित्यावर मागास समाजाचे नेते म्हणून छगन भुजबळ यांचे छायाचित्र होते. यादव यांनी भुजबळ यांचे छायाचित्र प्रचार साहित्यामध्ये न वापरण्याचे आदेश दिले.

अधिक वाचा  पुण्यात भाजपा मित्र पक्षाला मोठा धक्का; भाजपलाही धक्कादायक प्रवेशामुळे ही नवी भिती! एकावेळी २०० कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा

सोनपूर मतदारसंघातील उमेदवार धर्मवीर कुमार हे भुजबळ यांचे समर्थक मानले जातात. पिछडा जातीच्या नेते असलेल्या भुजबळ यांना पक्षाकडून दिल्या जात असलेल्या वागणुकीचा धर्मवीर कुमार यांनी निषेध केला. तसेच विधानसभा निवडणुकीतून आपण माघार घेत असून पक्षसुद्धा सोडत असल्याचे जाहीर केले होते. या प्रकारणाची बिहारमधील प्रसिद्धी माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय निरीक्षक पदावरुन यादव यांची तात्काळ हकालपट्टी केली होती व यादव यांना बिहारच्या निवडणुकीमध्ये काम न करण्यास बजावण्यात आले होते.

प्रकरण सार्वजनिक झाल्याने पक्षाने राष्ट्रीय सचिव सच्चितानंद सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीने पक्षाकडे यासंदर्भातला अहवाल नुकताच दिला होता. यादव यांनी झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला नाही. यादव यांनी अनावश्यक वाद निर्माण करुन पक्षामध्ये असंतोष निर्माण केला, असा ठपका समितीने अहवालामध्ये ठेवला आहे. अखेर पक्षाने यादव यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी जाहीर केले.

अधिक वाचा  पुणे भाजपच्या दुटप्पी भूमिकेने शिवसेनेपुढे प्रश्नचिन्ह?; पदरात तोकड्याच जागा अन् त्याही एकदम कडक पाषाण

भुजबळांना बिहारमध्ये मान :

छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे बिहारमध्ये चांगले कार्य आहे. बिहारमध्ये इतर मागास वर्गीयांची संख्या मोठी असल्याने भुजबळ यांचा तळागाळात चांगला संपर्क आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते बिहारमध्ये समता परिषद सक्रिय आहे. त्यामुळेच प्रचार साहित्यात भुजबळ यांच्या छायाचित्राचा वापर न करण्याच्या वरिष्ठांच्या आदेशामुळे उमेदवाराने सरळ निवडणुकीतून माघार घेतली होती.

पक्षातील वाद चव्हाट्यावर :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी वरिष्ठ जातीचा समजला जातो. ओबीसी नेत्यांना या पक्षात दुय्यम स्थान राहिले आहे. उत्तर भारतातले राजकारण ओबीसी वर्चस्वाचे आहे. त्यामुळे भुजबळ यांना दुय्यम स्थान देण्याचा प्रकार पक्षाच्या चांगलाच अंगलट आला. बिहारमध्ये पक्षाची मोठी बेईज्जत झाली. त्यामुळे पक्षाने राजकुमार यादव यांची हकालपट्टी घेण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?