पुणे मनपा क्रीडा विभाग भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने; मनपा आयुक्त यांची भेट तात्काळ कारवाईचे संकेत

0

पुणे – पुणे महानगरपालिका क्रीडा विभागातील गंभीर भ्रष्टाचार, अनियमित कंत्राटे, मनपा मालमत्तेचा अनधिकृत ताबा, सत्ताधारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असलेल्या प्रभाग क्रमांक २७ मधील सानेगुरुजी नगर येथील कै भानुदास गेजगे व्यायामशाळा गैरव्यवहारांविरोधात महाविकास आघाडी, प्रभाग क्रमांक 27 यांच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले, यावेळी भ्रष्ट क्रीडा विभाग अधिकार्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यामुळे पुणे महानगर पालिकेच्या बाहेर काही काळ तणाव निर्माण झाल होता.

आंदोलनानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेऊन क्रीडा विभागातील कै भानुदास गेजगे व्यायामशाळा सानेगुरुजी नगर पुणे येथील गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि संगनमताबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

आयुक्त श्री. नवलकिशोर राम यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांची गंभीर दखल घेतली असून सदर प्रकरणात आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे संकेत दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून तातडीने चौकशी सुरू करण्याबाबत आश्वासन दिले.

यावेळी बोलताना शिवसेनेचे अनंत घरत म्हणाले धर्मादाय आयुक्त न्यायालयाने ५००० रुपयांचा दंड ठोठवून अनियमित ठरविलेल्या मंडळास तसेच खोटा मंडळाचा उपाध्यक्ष देऊन क्रीडा विभागासोबत केलेल्या करारात उपनिबंधक कार्यालयाची म्हणजेच शासनाची, पुणे मनपाची तसेच करदाते पुणेकरांची सत्ताधारी भाजप नगरसेवकाने, पक्षाच्या एका मुख्य पदाधिकाऱ्याने फसवणूक केली आहे आणी त्यास क्रीडा विभाग तत्कालीन उपायुक्त हे ही तेवढेच जबाबदार आहेत.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

तर युवक काँग्रेस चे सागर धाडावे म्हणाले आयुक्तांनी तत्पर सदर विषयात लक्ष घालून प्रशासन हे निपक्ष काम करते हे दाखवून द्यावे आणी पालिकेची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अन्यथा आम्हाला सदर विषयात न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील.

शिष्टमंडळाने स्पष्ट शब्दांत प्रशासनाला कळविले की –

 • क्रीडा विभागातील भ्रष्टाचाराचे संरक्षण उखडून टाकले पाहिजे

 • मनपा मालमत्तेचा अनधिकृत वापर थांबला पाहिजे

 • अधिकारी–सत्ताधारी संगनमत

…हे सर्व प्रकार तात्काळ थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.

प्रशासनाने तातडीने ठोस पावले न उचलल्यास महाविकास आघाडीच्या वतीने आणखी तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

अधिक वाचा  पुण्यात भाजपा मित्र पक्षाला मोठा धक्का; भाजपलाही धक्कादायक प्रवेशामुळे ही नवी भिती! एकावेळी २०० कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा

यावेळी आंदोलनास अनंत घरत-प्रसिद्धी प्रमुख पुणे शिवसेना, सागर धाडावे -सरचिटणीस युवक काँग्रेस, डॉ मदन कोठुळे शहरध्यक्ष- राष्ट्रवादी श प क्रीडा विभाग पुणे,

पुणे महिला काँग्रेस अध्यक्षा स्मिता शिंदे, शिवसेना माजी गटनेता अशोक हरणावळ, दिलीप पोमण, कुणाल काळे, नंदू वीर, संदीप काळे, किरण गायकवाड, अभिजीत बारवकर, युवराज दिसले, निलेश वाघमारे, गणेश घोलप, प्रतीक अल्हाट, रवी भोसले, सूरज खंडाळे, मंगेश जाधव, आदित्य इंदुलकर, फारुक शेख, राहुल गाळिंदे, इम्रान पठाण, विनय ओव्हाळ, प्रतीक गाळींदे, उदय निगडे, उपस्थित होते.