आज ‘सर्वोच्च’ फैसला ‘स्थानिक’च्या निवडणुकांचे भविष्य काय? ही आकडेवारी सादर होणार या ३ शक्यता

0

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? जिथे आरक्षण मर्यादा ओलांडली गेली अशा नगरपरिषद, नगरपंचायतींबद्दल काय निकाल दिला जातो, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांबद्दल शुक्रवारच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणच्या निवडणुका रद्दही केल्या जाऊ शकतात, असे संकेत मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दिले होते. तसेच याबद्दलची आकडेवारी शुक्रवारी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

काय होऊ शकेल? ३ शक्यता

१. जिथे ५०% आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे, तिथली निवडणूक स्थगित हाेऊ शकते.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

२. निवडणुका घेण्याचे निर्देश दिले जातील, पण भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून असेल.

३. ५०% मर्यादा सांभाळूनच निवडणुका घेण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात.