उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याच्या तयारीत? जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत आज महत्त्वाची घडामोड घडली

0

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष यासाठी कामाला लागला आहे. प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढायची की स्वतंत्र लढायची याबाबतही विचार विनिमय सुरु आहे. तसेच शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात सातत्याने भेटीगाठी होताना दिसत आहेत. यामुळे आगामी काळात ठाकरे बंदू राजकारणात एकत्र येतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. याबाबत उद्धव ठाकरे पक्षाच्या आगामी दसरा मेळाव्यात घोषणा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याबाबतची मोठी घोषणा होण्याआधी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आज महत्त्वाची घडामोड घडली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

उद्धव ठाकरे यांनी आज विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हाप्रमुखांची महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिलेदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रमुखांच्या आजच्या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत, नगर पंचायत, नगर परिषदेच्या निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना काय-काय सूचना दिल्या?

आपण महाविकास आघाडीसोबत लढावं की मनसेसोबत युती करावी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना केलं आहे. स्थानिक पातळीवरची ताकद ओळखून याबाबत काय निर्णय घ्यावा हे सूचित करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले आहेत. आपली कुठे ताकद आहे, याबाबत माहिती द्या. आघाडीसोबत निवडणूक लढवण्याबाबत काय मत आहे, ते लवकर मांडावं जेणेकरुन निर्णय घेता येईल, असं उद्धव ठाकरे आपल्या जिल्हा प्रमुखांना म्हणाले आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

नगर पंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे कामाला लागा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखांना दिले आहेत. मतदार याद्यांमध्ये जे घोळ आहे ते आताच तपासा आणि त्यावर प्रश्न विचारा, जेणेकरुन नंतर घोळ होणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच 14 तारखेला भारत-पाकिस्तान विरोधात आंदोलन करा आणि महिला पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर पाठवा, असंदेखील आवाहन उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना केलं.