“कोहलीला बाजूला करत, ‘प्रिन्स’ शुबमन गिल झाला नवा किंग !” – युवराज सिंहकडून कौतूक; कर्णधार म्हणून पहिल्याच टेस्टमध्ये शानदार शतक

0

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज आणि नवोदय कर्णधार शुबमन गिल याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच टेस्ट सामन्यात शानदार शतक झळकावून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग यान थेट घोषणाच केली, “कोहलीला बाजूला करत, प्रिन्स शुबमन गिल झाला नवा किंग !”

गिलने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचं पारंपरिक चौथे स्थान सांभाळत, इंग्लंडच्या आघाडीच्या गोलंदाजांवर जबरदस्त फटकेबाजी केली. हेडिंग्ले, लीड्स येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने झळकावलेले शतक हे त्याचे SENA देशांतील पहिले कसोटी शतक ठरले.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

गिलने आपली नैसर्गिक शैली कायम ठेवत कोणत्याही दबावाखाली न खेळता सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. ब्रायडन कार्स, बेन स्टोक्स, जोश टंग आणि क्रिस वोक्स यांसारख्या गोलंदाजांना त्याने संधी दिली नाही.

युवराज सिंगकडून कौतूक
युवराज सिंगने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत गिलचे कौतुक करताना लिहिले: “काही गोष्टी नियतीनेच लिहिलेल्या असतात. पहिल्याच कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून परदेशात शतक – अभिनंदन @ShubmanGill! तू जबाबदारी काय असते ते समजतोस आणि बॅटनेच उत्तर दिलेस. आणखी शतकांसाठी शुभेच्छा!”

गिल व युवराज यांच्यात घनिष्ठ नाते असून युवराजने त्याच्या करिअरच्या सुरुवातीलाच गिलला मार्गदर्शन केले आहे.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!