पुणे महापालिकेची गणेशउत्सव २०२५ नियमावली जाहीर; मंडळांसाठी काय आहेत नियम ? सविस्तर वाचा…

0
22

अवघे काही दिवस गणरायाच्या आगमनाला राहिले आहेत. यामुळे सार्वजिक गणेशउत्सव मंडळाची लगभग पाहायला मिळत आहे. पुणे शहरात आणि जिल्ह्यात गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गणेशउत्सवाला दिवस कमी राहिल्याने महापालिकेकडून आगामी गणेशउत्सव आणि नवरात्रउत्सवासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने आखून दिलेल्या नियमानुसारमंडळांना महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे.

असे आहेत नियम?

  • मंडपाची उंची ४० फुटांपेक्षा जास्त नसावी.
  • (अधिक उंच मंडपास ‘स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी’ बंधनकारक)
  • मंडप व स्वागत कमानी उभारताना आपत्कालीन सेवा वाहनांसाठी रस्ते मोकळे ठेवणे बंधनकारक
  • कमानींची उंची रस्त्याच्या पृष्ठभागापासून १८ फुटांपेक्षा जास्त राहील.
  • स्वयंसेवक किंवा सुरक्षारक्षक आवश्यकतेनुसार नेमावेत.
  • पर्यावरण व ध्वनिप्रदूषण सर्व नियम बंधनकारक
अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

अत्यंत महत्वाचे…

  • २०१९ मध्ये दिलेल्या उत्सव मंडप, स्वागत कमानी आणि रनिंग मंडप इत्यादीच्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येतील.
  • परवानाधारकांना नव्याने परवानगीची आवश्यकता नाही.
  • शहरात ज्या मंडळांना नव्याने गणेशोत्सव साजरा करायचा असेल किंवा २०१९ची जागा प्रकल्प बाधित झाल्याने बदल करायचा असल्यास त्यांना २०१९ नुसारच परवानगी मिळणार
  • उत्सव संपल्यानंतर मंडळांनी ३ दिवसांच्या आत स्वखर्चाने मंडप, रनिंग मंडप, देखावे, विटांचे बांधकाम आणि अन्य साहित्य हटवावे, असे पालिकेने सांगितले आहे.

आग्रही मागणी

पुणे शहरातील मानाच्या ५ गणपतींची विसर्जन मिरवणूक निघाल्यानंतर इतर सार्वजनिक मंडळे मार्गस्थ होतात. यामुळे विसर्जन मिरवणुका वेळेत पूर्व होत नाहीत. या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यासह सर्व मार्गावरील गणपती विसर्जन मिरवणूक सकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी जोर धरू लागली आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे