‘ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? ‘, संरक्षणमंत्र्यांनी संपूर्ण मोहिमेवर लोकसभेत सांगितलं नेमकं कारण

0
22

पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानचा सपशेल पराभव झाला. या संपूर्ण मोहिमेवर लोकसभेत चर्चा सुरु झाली आहे. केंद्र सरकारकडून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेला सुरुवात केली.

‘तो’ दावा निराधार आणि खोटा

लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर राजनाथ सिंह म्हणाले की, “6 आणि 7 मे रोजी एक ऐतिहासिक लष्करी कारवाई केली गेली, ही केवळ लष्करी कारवाई नव्हती तर दहशतवादाविरोधातील आमची कठोर भूमिका होती.” संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानने हार मानल्यानंतर भारताने युद्धविराम केला, यात इतर कोणाचीही कोणतीही भूमिका नाही. राजनाथ सिंह म्हणाले की, “जसे हनुमानजींनी लंका जाळली, तसेच आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केले.” यासोबतच, संरक्षण मंत्र्यांनी हे देखील स्पष्ट केले की, पाकिस्तानविरुद्ध युद्धविराम घडवून आणण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीचा दावा निराधार आणि खोटा आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “…भारताने कारवाई थांबवली कारण संघर्षापूर्वी आणि त्यादरम्यान जी काही राजकीय आणि लष्करी उद्दिष्टे ठरवली होती, ती आम्ही पूर्णपणे साध्य केली होती. त्यामुळे, ऑपरेशन कोणत्याही दबावाखाली थांबवण्यात आले, असे म्हणणे निराधार आणि पूर्णपणे चुकीचे आहे.”

‘ऑपरेशन सिंदूर’ का थांबवले?

सीमेपार करणे किंवा तिथल्या जमिनीवर कब्जा करणे हा आमचा उद्देश नव्हता. तर दहशतवादाविरुद्ध होता. हे त्या लोकांसाठी होते, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले. आम्ही फक्त त्यांना लक्ष्य केले, ज्यांनी दहशतवादी हल्ला घडवून आणला. लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते, याचा उद्देश कोणत्याही परिस्थितीत युद्ध सुरू करणे नव्हता. भारताने 10 मे रोजी पाकिस्तानच्या हवाई पट्ट्या उद्ध्वस्त केल्या, तेव्हा त्यांनी हार मानली. ते म्हणाले की, “आता खूप झाले, थांबा.” यावर ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात आले.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

विरोधकांनी ‘तो’ प्रश्न का विचारला नाही?

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “आपले किती विमान पाडले, असे विचारण्याऐवजी आपण शत्रूचे किती विमान पाडले, असे विचारायला हवे होते. जर तुम्हाला ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाले का, असा प्रश्न विचारायचा असेल, तर त्याचे उत्तर ‘हो’ आहे.”

ज्यांनी आपल्या मुली आणि सुनांचे सिंदूर पुसले, त्यांना आम्ही मिटवले.आपल्या सैनिकांना काही नुकसान झाले का, असा प्रश्न विचारायचा असेल तर ‘नाही’. उद्दिष्टे मोठी असताना छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष देऊ नये, असे संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.