फोन चार्ज करण्यासाठी काकांचा जीवघेणा जुगाड; उघड्यावरून चोरली थेट वीज!

0
25

जुगाड म्हणजे आपत्ती काळात उपयोगी पडणारा मार्ग, पण काही वेळा हे जुगाड जीवावर बेतू शकतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात एक इसम थेट विद्युत वाहक ताऱ्यांवरून आपला मोबाईल चार्ज करताना दिसतो आहे! या थरारक प्रकाराने नेटकऱ्यांना हादरवून टाकलं आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं की, काकांनी एक लांब दांडा घेतला आहे, त्यावर चार्जर अडकवलेला आहे आणि थेट चालू वीज वाहक तारांना तो जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. थोड्याच वेळात चार्जर त्या तारेला जोडला जातो आणि मोबाईल चार्ज होतो. पण हा जुगाड जितका अचंबित करणारा आहे, तितकाच जीवघेणाही आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

जरा सी चूक झाली असती, तर थेट वीजेचा धक्का बसून प्राण गमवण्याचीही शक्यता होती. व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त आणि आश्चर्यचकित आहेत. एकाने कमेंट केली, “काका चार्जर नव्हे, स्वतःचं बायोपास करून घेणार होते!” तर दुसऱ्याने लिहिलं, “हा स्टंट आहे की आत्महत्या?”

 

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर krishna_das___123 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून काही लाख लोकांनी तो पाहिला आहे. हसत-हसत जीव धोक्यात घालणाऱ्या या प्रकारामुळे, विद्युत विभाग आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर मानली जात आहे.

अशा जीवघेण्या जुगाडांपासून दूर राहावं, असं आवाहन वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. मोबाईल चार्ज करायला जीवन धोक्यात घालणं, ही शहाणपणाची गोष्ट नाही. तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी असे प्रकार टाळणे अत्यंत आवश्यक आहे.