कर्वेनगर शाहु कॉलनीत वारंवार ‘बत्तीगुल’ तातडीने ‘बॅकफिडिंग’ उपाययोजना करा; स्वप्निल दुधाने यांची मागणी

0
2

कर्वेनगर शाहु कॉलनी परिसरामध्ये सात दिवसांपासुन पाणंद रस्त्यावरील MSEB मेन लाईनचे फॉल्ट झाल्याने ७ ते ८ तास MSEB लाईन बंद होत्या. हे प्रकार सातत्याने घडत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा संपुर्ण परिसर निवासी तसेच शैक्षणिक संस्थांचा व विद्यार्थांचा असल्याने या सर्वांची प्रचंड गैरसोय होत आहे. तातडीने ‘बॅकफिडिंग’ उपाययोजना करावी अशी स्वप्निल दुधाने यांनी कार्यकारी अभियंता एस.एन.डी.टी महावितरण विभाग पुणे यांच्याकडे मागणी केली आहे.

शाहू कॉलनी परिसरामध्ये लेन नं. १ ते ११ विदिशा रेसिडेन्सी, विशाखा रेसिडेन्सी, पिनॅक रेसिडेन्सी, आनंद रेसिडेन्सी, आशा रेसिडेन्सी, बराटे एम्पायर, चिंतामणी रेसिडेन्सी कुठल्याही प्रकारची ‘बॅकफिडिंग’ यंत्रणा (म्हणजेच एका बाजुने असलेला सप्लाय बंद पडला तर दुसऱ्या बाजुने चालु करणे) नसल्यामुळे १० ते १२ तास नागरिकांना सेवा मिळत नाही. रस्ते खोदाई वेळी केबल तुटल्याने वीज खंडित झाली असून ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी तब्बल दहा ते बारा तासांचा अवधी लागल्याचे निदर्शनास आले. आपल्या महावितरण विभागाकडुन नागरिकांना कुठल्याही प्रकारची पुर्वसुचना तसेच लाईट गेल्यानंतरही काहीही निरोप, मेसेजस कळविले जात नाही. त्यामुळे संपुर्ण भागामध्ये एक प्रकारचा संताप नागरिकांमध्ये आहे. याबाबत त्वरित आपल्या विभागाकडुन ‘बॅकफिडिंग’ यंत्रणा उभारण्यात यावी अन्यथा नागरिकांसोबत निषेध व्यक्त करुन आपल्या कार्यालयास घेराव घालुन आंदोलन करण्याचा इशारा स्वप्निल लक्ष्मी देवराम दुधाने अध्यक्ष – कोथरूड विधानसभा मतदारसंघ NCP- SP यांनी दिला आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय