कोथरूड शिवसैनिकच बनला ‘ॲम्बुलन्स’ ड्रायव्हर; सजग कार्यकर्त्यामुळे वाचले परप्रांतीय तरुणाचे प्राण

0
1

कोथरूड : कोथरूड कर्वे रस्त्यावरील शिवसेना शाखे समोर दुचाकी वरील तरुण गंभीर अपघातात जखमी झाला. प्रसंगावधानाने शिवसैनिकाने विनाविलंब स्वतः ॲम्बुलन्स चालवत परप्रांतीय तरुणाचा जीव वाचवण्यास मदत केली. अपघातग्रस्त भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रुग्णवाहिका तिथे उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु चालक नसल्याने वेळेत उपचार होण्यास येणारी अडचण लक्षात घेऊन शिवसैनिक माजी सदस्य पुणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती जयदीप पडवळ यांनी स्वतः वाहन चालवत तरुणाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. योग्य वेळेत उपचार मिळाल्याने तरुणाचा जीव वाचवण्यास मदत मिळाली.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

महर्षी कर्वे पुतळ्याजवळ दुचाकीवरून चाललेल्या तरुण दुभाजकाला धडकल्याने डोक्याला जखम झाल्याने गंभीर जखमी झाला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव वाहत असल्याने या तरुणाला तत्काळ तात्काळ जवळील कै. सरस्वती कराड एमआयटी पौड रोड येथे ऍडमिट करण्यात आले. तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे त्या तरुणाचे प्राण वाचले. वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य जयदीप पडवळ, संदिप मोकाटे,  विशाल भेलके, मारुती वर्वे, अजय भुवड,  संतोष लांडे, यश जगताप यांच्यासह कार्यकर्ते तसेच नागरिक व इतरांनी लगेच त्या मुलाला हाॅस्पिटलला घेऊन जायची व्यवस्था केली. जयदीप पडवळ यांनी रुग्णवाहिका चालकाची वाट न पाहता स्वतः रुग्णवाहिका चालवून पेशंट हॉस्पिटल पर्यंत पोहोचवला. सदर एकांत त्यागी हा तरुण कामानिमित्त उत्तर प्रदेशामधून पुण्यात आला होता.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे