पुणे शहरामध्ये पुणे महापालिकेच्या संचलनात असलेल्या सर्व शहरी आरोग्य केंद्रांपैकी राज्यस्तरीय गुणवत्ता मूल्यमापनात पुणे महानगरपालिकेच्या शहरी आरोग्य केंद्रांमध्ये कै. पृथक बराटे दवाखान्याने प्रथम क्रमांकाचे २ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले असून वारजे या नव्याने विस्तारित झालेल्या उपनगरामध्ये उत्तुंग कामगिरी करत ‘पृथक’ यश प्राप्त करण्यात आले आहे. माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन काम करताना वस्ती विभागातील नागरिकांसाठी दवाखान्यातील संपूर्ण टीम अहो रात्र काम करत असल्याने सौहार्द वागणूक आणि अथक परिश्रम, समर्पण आणि रूग्णसेवेतील त्यांची गुणवत्ता यामुळेच ही अभिमानास्पद पुरस्कार प्राप्ती झाली आहे.
माजी उपमहापौर दिलीपभाऊ बराटे यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नातून हे रुग्णालय उभे राहिले आहे. त्यांची दूरदृष्टी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ यातूनच आज हा दवाखाना हजारो नागरिकांसाठी आधारवड ठरत आहे. राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा ‘कायाकल्प’ पुरस्काराचा हा सन्मान अथक परिश्रम, समर्पण आणि रूग्णसेवेतील गुणवत्तेसाठी राबलेल्यांच्या स्वप्नांना मिळालेले हे यश आहे. या ‘कायाकल्प’ पुरस्कारामुळे पुणे शहरातील आरोग्य सेवेची गुणवत्ता आणखी वाढेल अशी खात्रीही आहे.