सर्वात मोठी चोरी! १६ अब्ज गुगल, अॅपल आणि फेसबुक खात्यांची माहिती लीक

0

गुगल, अॅपल आणि फेसबुकसारखी अकाउंट्स वापरणाऱ्या १६ अब्ज वापरकर्त्यांची लॉगिन माहिती आणि पासवर्ड चोरीला गेले असल्याचं समोर आलं आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी पासवर्ड चोरी मानली जात आहे.

डार्क वेबवर विक्रीला उपलब्ध
सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी उघड केलं आहे की ही माहिती डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. यात Google, Apple, Facebook, GitHub, Telegram आणि अनेक सरकारी संस्थांच्या लॉगिन डिटेल्सचा समावेश आहे.

काय धोका आहे?

  • फिशिंग अ‍ॅटॅक (खोट्या लिंकवर क्लिक करून फसवणूक)
  • ID चोरी
  • तुमचं अकाउंट हॅक होऊन दुसऱ्याच्या ताब्यात जाणं
अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

हे कसं घडलं?
फोर्ब्सच्या अहवालानुसार, ३० वेगवेगळ्या डेटासेटमधून ३.५ अब्ज पेक्षा जास्त रेकॉर्ड लीक झाले. हे सर्व इन्फो-स्टिलर मालवेअर (सॉफ्टवेअर जे माहिती चोरतं) मुळे झालं आहे.

आता काय कराल?
तुमचं अकाउंट लीक झालं आहे का हे तपासण्यापेक्षा, पुढील गोष्टी लगेच करा:

  • सर्व खात्यांचे पासवर्ड त्वरित बदला.
  • ‘2-Step Verification’ (OTP द्वारे खात्री) ऑन करा.
  • Passkeys वापरा – हे पासवर्डपेक्षा अधिक सुरक्षित.
  • संशयास्पद ईमेल किंवा लिंकवर क्लिक करू नका.

गुगल आणि इतर कंपन्यांनी वापरकर्त्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सुरक्षित राहा आणि डिजिटल सावधगिरी बाळगा!

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती