…अखेर ‘एकलव्य कॉलेज ते हायवे सर्व्हिस रस्ता’ 30 वर्षांचा प्रश्न मार्गी; नगरसेवक किरण दगडेपाटील यांची कसब अन् संबंध कामी 

0
3

कोथरूड मधील मिसिंग लिंक चा जेव्हा जेव्हा विषयी यायचा तेव्हा तेव्हा केवळ एकलव्य कॉलेज ते चांदणी चौक हा रखडलेला विषयच! कायम चर्चेत आल्याशिवाय राहत नव्हते या रस्त्याच्या कामासाठी गेली 30 वर्षापासून वेगवेगळ्या पदावर लाभ घेणाऱ्यांनी आश्वासनांची सरबती केली …..उद्घाटन केली परंतु केवळ पोकळ भाषा न करता स्थानिक जागा मालक अन पुणे महानगरपालिका प्रशासन यांचा सुयोग जुळवून आणत माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी या जटिल प्रश्नांना अत्यंत कसबीने आणि आपल्या व्यक्तिगत संबंधाच्या जोरावर रामबाण उपाय शोधल्याने लाखो कोथरूडवासीयांसाठी पर्वणी असलेल्या एकलव्य कॉलेज ते चांदणी चौक या मुख्य रस्त्याच्या कामाचा अडथळा दूर झाला आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

उच्च तंत्र शिक्षणमंत्री मा. श्री.चंद्रकांतदादा पाटील व केंद्रीय मंत्री श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनात पुणे महापालिकेत विविध बैठका झाल्यानंतर नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी व्यक्तिगत लक्ष घालत आपल्या नेतृत्वगुणाची कसोटी आणि सहस्नेहाच्या संबंधाच्या जीवावर बांदल कुटुंबियांकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. पुणे महापालिकेच्या प्रशासनाकडून स्थानिक जागा मालकाला देण्यात आलेल्या त्रासामुळे या प्रश्नाला उत्तर मिळत नसल्याची जाणीव झाल्यानंतर पुणे महापालिका प्रशासकीय पातळीवरही संबंधित जागा मालकाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी बैठकांचे आयोजन केले. त्यानंतर पुणे महापालिका प्रशासन आणि जागा मालक यांची एकत्र बैठक आयोजित करून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मध्य मार्ग करण्याची सूचना नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केली. कोथरूड भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व स्थानिक प्रश्नांसाठी कोथरूड क्षेत्रीय कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जाण्यासाठी या रस्त्याची गरज लक्षात घेऊन या प्रश्न स्थानिक जागा मालकांसाठी काही निर्णय घेण्याचा आग्रह माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केला.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

स्थानिक जागा मालक बांदल कुटुंबीय यांच्या संपूर्ण शंकांचे निराशरण झाल्याने आज रस्त्याच्या जागेची रीतसर ताबापावती कुटुंबीयांकडून पुणे महानगरपालिका अधिकारी श्री. पावसकर यांच्याकडे देण्यात आली असून गेली 30 वर्ष रखडलेला एकलव्य कॉलेज ते हायवे रस्ता करण्याचा मार्ग मोकळा झाला असून एक आठवड्यात हा रस्ता पूर्ण होईल असे आश्वासन पुणे महापालिकेच्या पथ विभागामार्फत देण्यात आले आहे. सर्वसामान्य कोथरूडकर यांच्या अत्यंत निकडीच्या प्रश्नाला न्याय मिळण्यामध्ये संपूर्ण बांदल कुटुंबाचे सहकार्य अत्यंत मोलाचे असून सर्व लोकांनी यासाठी संपूर्ण बांदल कुटुंबाचे मनापासून आभार मानले पाहिजेत असे आवाहन माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी यावेळी केले.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?